सुधा प्रकल्पाची उंची असो, पिंपळढव तलावाचा प्रश्न खासदार चिखलीकर यांनी सोडवला का अशोक चव्हाणांनी…

भोकर(माधव मेकेवाड) : पोलीसनामा ऑनलाइन  – लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. त्या पराभवांतर अशोक चव्हाण यांचे अनेक निकटवर्तीय लोक राजीनामा दिले. भोकर मतदार संघाला असो का नांदेड जिल्ह्याला ओळख अशोक चव्हाण यांच्या मुळे मिळाली. पण अशोक चव्हाण यांनी केलेले विकास कामे आज पडद्याआड जात असल्याची खंत काँग्रेस पदाधिकारी करत आहे. सुधा प्रकल्प करण्याचं काम डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी केलं. पण त्यांची आज रोजी आवश्यक असलेले उंची वाढवणे गरजेचे असल्याने अनेक वेळा निवेदन अशोक चव्हाण यांच्याकडे केली. त्यांच्या हातून त्यांनी देखील पाठ पुरावा केला. पण ते काम करण्यासाठी आज ८ वर्षे उलटले त्याला कुठे आज यश आले असे काँग्रेस कार्यकर्ते म्हणत आहेत.

दुसरीकडे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला. त्या विश्वासाला तडा जाऊ नये. म्हणून खासदार झाल्या झाल्या अवघ्या १ महिन्यात भोकर तालुक्यात प्रलंबित असलेले कामे मार्गी लावण्यासाठी खा. प्रताप चिखलीकर यांचे प्रयत्न सुरू आहे. पिंपळढव साठवण तलाव ,रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याची आवश्यक त्या परवानग्या मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रकल्पाच्या प्रलंबित समस्या सुटणार आहेत. ह्याचा सर्व मोबदला प्रताप पाटील चिखलीकर यांना जाताच अशोक चव्हाण यांचे निकट वृत्तीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोसिल मीडिया वर चिखलीकर यांची खिल्ली उडवताना दिसले आहेत. पण त्या असे सांगितले की, अशोक चव्हाण यांनी त्या कामाचा पाठपुरावा केला त्यांचे हे खरे प्रयत्न आहेत. म्हणून मोठं मोठ्या वर्तमान पत्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण(आमदार,भोकर विधानसभा) यांच्या फोटो सह अनेक वर्तमान पत्रात जाहीर आभार चे जाहिरात टाकलेली दिसली आहे.

एकीकडे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणतायत की, हे काम करण्यासाठी मी प्रयत्न केला व या कामाला मला यश आले माझे प्रयत्न फेल गेले नाही. तर दुसरी अशोक चव्हाण यांनी केलेल्या पत्र व्यवहाराचा बंच ह्या मध्ये नेत्याचं कार्य कार्यकर्यांच्या प्रतिष्ठा ठरत आहे का अशी चर्चा भोकर शहरात सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन