HR Manager Suicide | खळबळजनक ! प्रसिद्ध कंपनीतील 30 वर्षाच्या HR मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

इंदुर : वृत्तसंस्था – एका मोठ्या कंपनीतच्या एआर मॅनेजर पदावरील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (HR Manager Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील नरीमन पॉइंट मध्ये राहणारी शालू निगम Shalu Nigam (वय-30) नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आले. शालू निगमने तीन दिवसांपूर्वी एचआर मॅनेजर (HR Manager Suicide) पदाचा राजीनामा (Resign) दिला होता. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट (Suicide note) देखील मिळाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

शालू निगम ही मुळची सतना येथील राहणारी असून इंदूरमध्ये देव विग्रो कंपनीत (Dev Vigro Company Indore) एचआर पदावर काम करत होती. तीन दिवसांपूर्वी तिने राजीनामा दिला होता. घटनास्थळावर पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले की, तिच्यावर कोणीही आत्महत्येसाठी (HR Manager Suicide) दबाव टाकला नाही. त्यासोबत इतरही काही गोष्टी तिने लिहिल्या आहेत.

शालू निगम ही तिच्या बहिणीसोबत राहत होती. मागील तीन वर्षापासून एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. सायंकाळी जेव्हा लहान बहीण घरी पतरली तेव्हा तिने शालूच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले. त्यावेळी शालूचा मृतदेह लटकलेला दिसला. तिने या घटनेची माहिती सूना पोलीस ठाण्यात (Suna police station) आणि आपल्या नातेवाईकांना दिली.

शालूच्या घरच्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे की, शालू काही गोष्टींमुळे ऑफिसमध्ये टेंनशनमध्ये होती. मृत तरुणीचे मामा राकेश म्हणाले, आम्हाला सूचना मिळाली की, भाचीने फाशी घेतली आहे. दोन दिवसांआधीच तिच्यासोबत बोलणं झालं होतं. सांगत होती की, ऑफिसमध्ये खूप टेन्शन आहे.

कंपनीत काम करणारा तिचा सहकारी मानपाल सिंहने सांगतले, कंपनी मध्ये कोणतेही टेन्शन नव्हतं.
तिने तिच्या मर्जीने नोकरी सोडली होती. तिला कारण विचारलं तर तिने काहीही सांगितलं नाही. त्याबाबत काही माहित नाही.

 

डायरीत सापडली सुसाइड नोट

शालूने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिसांना ही चिठ्ठी तिच्या डायरीत सापडली.
यामध्ये तिने लिहिले की, मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या चिठ्ठीत तिने कंपनीतील स्टाफ कडून कोणताही त्रास होत होता,
याचा उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी शालूने आपल्या आई-वडिलांसोबत फोनवर बोलली होती.
तिने आपल्या आई-वडिलांना तिर्थ यात्रेवर पाठवण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर तिने आपला मोबाइल बंद केला.

Web Title :- HR Manager Suicide | hr manager Shalu Nigam hanged famous company in mp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – खा. सुप्रिया सुळे (व्हिडीओ)

Dhule Zilla Parishad Election | धुळ्यात महाविकास आघाडीला दणका ! चंद्रकांत पाटलांच्या मुलीची ‘बाजी’

IPL Cricket Betting | आयपीएल मॅचवरील बेटिंगप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाला अटक