Video : ऋतिकने ‘तू लगावे लू जब लिबिस्टिक’, बिहारी बोलण्यासाठी करावी लागली ‘इतकी’ मेहनत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ऋतिक रोशन या दिवसांमध्ये आपला चित्रपट ‘सुपर ३०’ मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये ऋतिकने गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका केली आहे. आनंद कुमार बिहार मधील आहे. त्यामुळे ऋतिकने आपला लुक त्यांचासारखा केला आहे आणि भोजपुरी देखील शिकला आहे. ऋतिकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओ मध्ये तो भोजपुरी गाणं ‘तू लगावे लू’ गातांना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये ऋतिकने सांगितले की, त्याला बिहारी भाषा खूप आवडते. व्हिडीओमध्ये ऋतिकने सांगितले की, त्याला आनंद कुमार बनण्यासाठी काय-काय करावे लागले. ऋतिकने सांगितले की, ‘आनंद कुमार सारखे दिसण्यासाठी मी सगळ्यात पहिले केले म्हणजे, मला अनफिट राहावे लागले.

https://www.instagram.com/p/B0Dql3xHNle/

ऋतिक दिवसातून २-३ घंटे बिहारी बोलण्याची प्रॅक्टिस करत असे. एका क्लिपमध्ये ऋतिक आपल्या मुलांसोबत बिहारी भाषा मध्ये बोलायला लागला होता. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. ऋतिक चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगवर भारताचे उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडूला भेटला. ऋतिकने उप्राष्ट्रपतींसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर करत त्यांचे आभार मानले. ऋतिकने दिल्लीमध्ये आपल्या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. नायडूंनी चित्रपटाचे डायरेक्टर, ऋतिक आणि आनंद कुमार यांना शुभेच्छा दिल्या.