Hruta Durgule | ‘या’ कारणामुळे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटक सोडलं,” ऋता दुर्गुळेने केले स्पष्ट

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं (Hruta Durgule) ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’मध्ये उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात तिने ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमधून पुढे आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. मालिकांमध्ये चमकल्यानंतर ऋतानं (Hruta Durgule) सिनेमा, नाटक आणि वेब सीरिजमध्येही नाव कमावलं. ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘अनन्या’, ‘टाइमपास 3’, ‘स्ट्रॉबेरी शेक’ अशा वैविध्यपूर्ण कलाकृतींमध्ये विशेष भूमिका साकारत तिनं प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

 

ऋताचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. पण ती सोशल मीडियावर कशी वावरते, या माध्यमाविषयीची तिची मतं, विचार याबद्दल तिनं विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इतरांचा विचार करत बसलो तर आयुष्यात पुढे जाता येणार नाही’, पण शब्दाला शब्द लागून वाद वाढवण्यापेक्षा अशा बोलण्याकडे दुर्लक्ष करणं योग्य असं परखड मत यावेळी तिनं मांडलं.

 

ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि उमेश कामत यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यातील ऋता आणि उमेशची बहिण-भावांची केमिस्ट्री सुपरहिट झाली. नाटकाचे सर्वच प्रयोग हाउसफुल होत होते. पण अशातच ऋताने हे नाटक सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “या नाटकातून बाहेर पडणं हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. त्यावेळी एकाच वेळी खूप कामं सुरू होती. पुरेसा वेळ देता येत नव्हता म्हणून नाटकाच्या टीमवर मला अन्याय होऊ द्यायचा नव्हता. म्हणून नाटकातून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला.

हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण जर आता अशी चांगली भट्टी जमून येणार असेल
तर मला पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करायला नक्कीच आवडेल.
” तर ‘अनन्या’विषयी अभिनेत्री म्हणाली की, ‘अनन्या ही कलाकृती माझ्यासाठी खास होती.
काहीही झालं तरी हार न मानण्याची अनन्याची वृत्ती मला भावली. या भूमिकेमागे बरीच मेहनत होती.
सिनेमाच्या चित्रीकरणानंतर रिकव्हर व्हायला मला काही वेळ द्यावा लागला.’
आता तिने नाटक का सोडले यावर दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ती पुन्हा कधी नाटकांमध्ये दिसणार
याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Web Title :- Hruta Durgule | hruta durgule shared why did she take exit from dada ek good news aahe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ