HSC Exam | बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका, बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मिळणार गुण पण ‘या’ विद्यार्थ्यांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरु झाली आहे. इंग्रजीचा पहिला पेपर (English Paper) झाला. मात्र, इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत सहा गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. बोर्डाच्या (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune) चुकीमुळे बारावीचे विद्यार्थी इंग्रजी पेपर सोडवताना संभ्रमात पडले होते. बोर्डाला आपली चूक लक्षात आली असून या गुणांची भरपाई विद्यार्थ्यांना (HSC Exam) मिळणार आहे. पेपरमधील चुका झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

 

 

 

21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर (HSC Exam) होता. या पेपरमध्ये कविता विभागात (Poetry Section) प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. पेपरमध्ये चुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बोर्डाने आपली चूक मान्य करत विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून त्या तीन प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जणार आहेत.

बोर्डाने सांगितले की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जातील. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळून आल्यानंतर बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितले होते. बोर्डाने दिलेल्या अहवालानंतर इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचे बोर्डाने मान्य करुन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्याचा निर्णय घेतला.

 

 

 

Web Title :- HSC Exam | 12th board exam students will get six marks after
mistakes made by the board in the english paper

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा