बारावीचा निकाल ‘याच’ आठवड्यात लागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून याच आठवड्यात निकालाची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली आहे. मागील दोन वर्ष बोर्डाकडून ३० मे रोजी ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यंदा आयसीएसई आणि सीबीएसई या मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर झाले. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल कधी लागणार किंवा लवकर लागणार का याविषयी विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली होती. यंदा राज्यातल्या नऊ विभागातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

You might also like