Huma Qureshi | ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ या पहिल्याच चित्रपटाबाबत हुमा कुरेशीने सांगितला अनुभव; मानधन फक्त दिले…

पोलीसनामा ऑनलाइन – बी-टाऊन मधील एक ब्युटीफूल व हॉट अभिनेत्रींमध्ये हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिचे नाव येते. हुमा आपल्या निखळ हास्याने व अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करते. तिचे चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडत असून तिचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. हुमाली ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ (Gangs Of Wasseypur) या चित्रपटाने तिची पहिली ओळख निर्माण केली. बॉलीवुडमध्ये हुमाने (Huma Qureshi) याच चित्रपटामधून पदार्पण केले. मात्र तिने या चित्रपटाबाबत तिचे सुरुवातीचे मत व तिला आलेल्या अडचणी शेअर केल्या आहेत. पहिल्याच चित्रपटानंतर तिला हरवल्यासारखे वाटू लागले असे हुमाने सांगितले आहे.

‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी केले होते. हा चित्रपट एक ॲक्शन क्राईम ड्रामा होता. यामध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हुमा बरोबरच या चित्रपटात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) व ऋचा चड्ढा (Richa Chadha) यांसारखे कलाकार होते. एका मुलाखती दरम्यान हुमाने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. हुमा म्हणाली की, मला खूप आधीच यश मिळालं होतं. 2010 साली मी मुंबईमध्ये आले. 2012 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो भारतभर खूप गाजला. पण माझं जग उद्ध्वस्त झालं.

हुमाने पुढे सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट झाला, तेव्हा काय चालले आहे ते कोणालाच समजले नाही. ‘मग मी म्हणाले, ‘वाह! मी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे का? माझा चेहरा होर्डिंगवर आहे?! यासाठी मला जास्त पैसे मिळायला हवे होते का? असे चित्रपट बनतात का?.” तसेच हुमाने सांगितले की, गॅंग्स ऑफ वासेपूर’ हा एक खास अनुभव होता (Huma Qureshi Photo) आणि ज्याने तिचं आयुष्य बदललं. कारण त्यानंतर ती हरवली होती, तिला असुरक्षित वाटू लागले.

हुमा म्हणाली की, ‘या चित्रपटासाठी मला फक्त 75,000 रुपये मानधन मिळाले होते. मी त्यांच्यासोबत (व्हायकॉम18) काम करत आहे, ते माझे निर्माते आहेत. पण तो माझा (Huma Qureshi) पहिलाच चित्रपट होता आणि त्यात काहीही फॅन्सी नव्हतं. तिथे राहायला कोणतेही पंचतारांकित हॉटेल नव्हते. व्हॅनिटी व्हॅन सीट किंवा लोकांची फौज तुमच्या मागे लागायला नव्हती. फक्त एक ग्रुप होता जो तीन महिन्यांसाठी वाराणसीला गेला होता आणि शूटिंग करून परत आला होता.” असा ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाबद्दल हुमाने अनुभव सांगितला. हुमाने (Huma Qureshi Movie) त्यानंतर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा नुकताच ‘तरला’ हा चित्रपट (Tarala Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Web Title :  Huma Qureshi | huma qureshi got 75 thousand only for her superhit debut movie gangs of wasseypur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Protest Against BJP Govt | काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन ! ‘भाजप’ वॉशिंग मशीन, ‘मोदी’ वाशिंग पावडर

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले?, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; म्हणाले…

Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

Uddhav Thackeray | ‘मर्दाची औलाद असाल तर या सरकारी यंत्रणा…’, उद्धव ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान (व्हिडिओ)