Hundred Review : ‘लारा दत्ता-रिंकु राजगुरू’ची दमदार अ‍ॅक्टींग, करण वाहीनं केलं ‘सरप्राईज’ !

पोलिसनामा ऑनलाइन –दीर्घकाळापासून सिमेमापासून दूर असणाऱ्या लारा दत्ता हिनं डिजिटल डेब्यू करत सर्वांना चकित केलं आहे. लारा दत्ता आणि सैराट फेम रिंकु राजगुरू यांची हंड्रेड ही नवी वेब सीरिज डिज्नी हॉटस्टारवर रिलीज झाली. रुची नारायण, आशुतोष शाह आणि ताहिर शब्बीर यांनी डायरेक्ट केलेली हंड्रेड ही वेब सीरिज कशी आहे हे आपण जाणून घेऊयात.

स्टोरी

मुंबईची नेत्रा पाटेल(रिंकु राजगुरू) हिची स्टोरी हंड्रेडमध्ये दाखवण्यात आली आहे. एकदा तिला कळतं की, तिला ब्रेन ट्युमर आहे. तिला ते सर्व काही करायचं असतं जे करण्याची तिची इच्छा असते. तिच्याकडे फक्त 100 दिवस असतात. त्यानंतर ती मरणार असते.

अशात एन्ट्री होते ती एसीपी सौम्या शुक्ला (लारा दत्ता जिचंही आयुष्य जास्त काही इंट्रेस्टिंग नसतं. तिला एक मोठी केस सॉल्व करायची असते परंतु तिला भलतच काम करावं लागतं. तिची पती प्रवीण नॉरकोटीक्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो. परंतु तो तिला सोपर्ट करत नसतो एकीकडे तिची चिंता आणि दुसरीकडे ती पुढे जाईल याची त्याला भीती असते.

अशात सौम्याला माहिती मिळते की, मुंबईत मोठ्या प्रमाणावर मानवी अवयवांची तस्करी केली जात आहे. तिला याचं भांडं फोडायचं असतं. नंतर सौम्या आणि नेत्राची भेट होते. मग सौम्या नेत्राचा वापर करून रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा विचार करते. डिपार्टमेंटला न सांगता ती हे मिशन पूर्ण करते.

यातील प्रत्येक पात्राची एक वेगळी स्टोरी आहे, संघर्ष आहे. त्यामुळं स्टोरी जरा मागे पडते. यातील पात्र स्टोरीवर हावी होतात. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला काही नवीन वाढलं जाईल तर असं अजिबात नाही. ही एक सिंपल क्राईम स्टोरी आहे जी वेगळे फ्लेवर अॅड करते.

अ‍ॅक्टींग

लारा दत्तानं दीर्घकाळानंतर वापसी केली आहे. सौम्याची काही करण्याची धडपड आणि जिद्द तिनं एकदम सही साकारली आहे. तिची डायॉलग डिलीव्हीव्हरीदेखील शानदार आहे.

या क्राईम सीरिजमध्ये रिंकु राजगुरूनं मात्र मनोरंजनाचा तडका दिला आहे. आपण मरणार आहोत असं नेत्रा म्हणजे रिंकु कुठेच जाणवू देत नाही. हीच या रोलची खासियत आहे.

यात सरप्राईज रोल केला आहे तो म्हणते करण वाही यानं. त्यानं आरजे मॅडीचा रोल केला आहे. करणनं या सीरिजमध्ये काम करून आपली चॉकलेट बॉयची इमेज तोडली आहे. त्याचा लहजा स्टाईल सारं काही हैराण करणारं आहे.

सीरिजमध्ये सुधांशु पांडे, परमीत सेठी, राजीव सिद्धार्थ या सहकलाकारांनीही चांगलं योगदान दिलं आहे. स्टोरी आवडेल न आवडेल परंतु या साऱ्यांचा परफॉर्मंस तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल.