चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून, सांगली जिल्ह्यातील घटना

पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा धारधार शस्त्राने  खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. शनिवारी (दि. 8) दुपारी साडेतीच्या सुमारास  फकीरवाडी (ता. शिराळा) येथे  ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुवर्णा सुभाष पवार (वय, 27, रा. फकीरवाडी) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.  शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सुभाष सदाशिव पवार वय (32)  सासू बबुताई सदाशिव पवार,  सासरे सदाशिव बाळू पवार  आणि दीर दिंगबर सदाशिव पवार सर्व (रा. फकिरवाडी ता.  शिराळा) यांनी चारित्र्याच्या संशयावरून सुवर्णाचा  धारधार शस्त्राने खून केला आहे.  फकिरवाडी गावच्या हद्दीत अब्दुलकादीर महेबुबसाब पीरजादे यांचे मालकीच्या शेतात शनिवारी दुपारी ही घटना घडली.  याबाबत भगवान श्रीपती पाटील यांनी फिर्याद दिली आहे.