Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

नवी दिल्ली : Hydrogen Fuel | पुढील दशकात म्हणजे 2030 पासून देशात आणि जगातील रस्त्यांवर पेट्रोल-डिझेलच्या ऐवजी पाण्यावर बस-ट्रक धावताना पाहून आपण सर्वजण हैराण होऊ शकतो. कारण वेगाने बदलणार्‍या या जगात काहीही शक्य आहे. या गोष्टीवर विश्वास बसत नसेल तर तुम्ही जास्त नाही तर केवळ मागील दोन दशकातील आपला प्रवास आठवून (Hydrogen Fuel) पहा.

मागील दोन दशकात अनेक गोष्टी अचानक आपल्या डोळ्यासमोरून अदृश्य झाल्या,
ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती. लँडलाईन फोन, रोलचे मॅन्युअल कॅमेरे, टेपरेकॉर्डर सारख्या अनेक वस्तू अचानक काळाच्या पडद्याआड गेल्या, आदृश्य झाल्या.
काहीसे अशाच प्रकारे ऑटोमोबाईलच्या जगात अशा गाड्या आल्या आहेत ज्यांची दोन-तीन दशकापूर्वी कुणी कल्पनाही (Hydrogen Fuel) केलेली नव्हती.

आपण येथे चर्चा करत आहोत पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) पर्यायी हायड्रोजन इंधनाची (hydrogen fuel).
आम्ही हायड्रोजनच्या ऐवजी पाणी या शब्दाचा अशासाठी वापर केला आहे
कारण या गॅसचा सर्वात मोठा स्त्रोत पाणी आहे. आपण हे शाळेत सुद्धा शिकलो आहोत.
पाणी हायड्रोजन आणि ऑक्सीजन या दोन घटकांपासून बनते.

TET Exam 2021 | टीईटी परीक्षेची तारीख पुन्हा बदलली, जाणून घ्या नवीन तारीख

जगात हायड्रोजनवर (hydrogen fuel) चालणार्‍या गाड्यांची केवळ यशस्वी चाचणीच झाली नसून अनेक कंपन्या या इंधनावर चालणार्‍या गाड्या बनवू लागल्या आहेत.
अपेक्षा आहे की, पुढील दशकापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या एका उपयोगी पर्यायाच्या रूपात हायड्रोजनचा विकास होईल.

काय आहे हायड्रोनजन, कशी तयार होणार वीज

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध एका रिपोर्टनुसार, 1783 मध्ये फ्रान्सचे रसायन शास्त्रज्ञ अँटोईन लॉरेंट डी लावोयसियर (Antoine Laurent de Lavoisier) यांनी पाणी तयार करणार्‍या घटकाचे नाव हायड्रोजन ठेवले.
यानंतर 1800 मध्ये विलियम निकोल्सन (William Nicholson) आणि अँथोनी कार्लिस्ले (Amthony Carlisle) यांनी पाण्याला हायड्रोजन आणि ऑक्सीजनमध्ये विभागले.

यानंतर 1839 मध्ये विलियम रॉबर्ट ग्रोव्ह नावाच्या शास्त्रज्ञाने हायड्रोजन आणि ऑक्सीजन एकत्र करून इलेक्ट्रिसिटी निर्माण करणार्‍या एका फ्यूएल सेलची निर्मिती केली.
इतकेच नव्हे, आपल्या ब्रह्मांडात जेवढे तारे आहेत ते सर्व हायड्रोजन आणि हिलियममध्ये रूपांतरीत होऊन उर्जा निर्माण करतात.

हायड्रोजन इंजिनचा विकास

तुम्ही ऐकून हैराण व्हाल की, 1857 च्या अगोदर स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वी जगात 1839 मध्येच हायड्रोजन इंजिनच्या सिद्धांताचा विकास करण्यात आला होता.
यानंतर ताबडतोब 1841 मध्ये एक इंजिनियर जॉन्सन यांनी कम्बूशन इंजिन (Combustion Engine) विकसित केले जे हायड्रोजन आणि ऑक्सीजनच्या मिश्रणाने तयार झालेल्या वीजेवर चालत होते.

हे देखील वाचा

High Court | पीडित महिलेचं चारित्र्य वाईट आहे असे म्हणून बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या सोडू शकत नाही : उच्च न्यायालय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Hydrogen Fuel | future of hydrogen fuel cell cars in the india and world why it is better than electric cars

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update