High Court | पीडित महिलेचं चारित्र्य वाईट आहे असे म्हणून बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या सोडू शकत नाही : उच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – High Court | बलात्काराच्या प्रकरणात (rape case) आपला निर्णय सुनावताना केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) म्हटले की, बलात्काराच्या आरोपीला (rape accused) यासाठी सोडता येणार नाही, कारण पीडितेला सेक्सची सवय (addiction) होती किंवा तिचे चारित्र्य चांगले नव्हते (bad character). न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले की, एका पित्याने आपल्या मुलीवर बलात्कार करणे यापेक्षा घृणास्पद दुसरा कोणताही गुन्हा असू शकत नाही.

 

आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर करणार्‍या पित्याला दोषी ठरवत जस्टिस आर. नारायण (Justice R. Narayan) यांनी म्हटले की, बलात्कार पीडितेच्या साक्षीने विश्वसनीयता या गोष्टीने प्रभावित होणार नाही की तिने एखाद्या अन्य व्यक्तीसोबत लैगिंक संबंध (relations) ठेवले होते. आरोपीकडून बाजू मांडण्यात आली की पीडितेने अन्य व्यक्तीसोबत संबंध ठेवले होते.

 

आरोपीची बाजू फेटाळत, न्यायालयाने (Kerala High Court) 11 ऑक्टोबरच्या निर्णयात म्हटले, जर एखाद्या मुलीचे चारित्र्य वाईट आहे किंवा तिला लैगिंक संबंध ठेवण्याची सवय असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की बलात्काराच्या आरोपीला सोडून द्यावे. जर तुम्ही असे समजले की पीडितेने अगोदर लैंगिक संबंध (relations) ठेवले होते, तर हा निर्णायक प्रश्न नाही. याउलट प्रश्न हा आहे की, आरोपीने पीडितेवर बलात्कार केला आहे का, ही ट्रायल आरोपीची आहे, पीडितेची नाही.

 

न्यायालयाने म्हटले की, यापेक्षा मोठा घृणास्पद कोणताही गुन्हा असू शकत नाही की, एक पिता आपल्या मुलीवर बलात्कार करतो.

 

Web Title :- High Court | rape accused cannot let off by saying victim easy virtue kerala hc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bombay High Court | रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी बनवणार की नाही? उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला ‘खडा’ सवाल

WhatsApp | 1 नोव्हेंबरपूर्वी करा ‘हे’ महत्वाचे काम, अन्यथा फोनमध्ये वापरू शकणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या

IRCTC Rupay SBI Card | फ्रीमध्ये मिळावा ट्रेन तिकिट, रेल्वे लाऊंज अ‍ॅक्सेसची सुविधा, जाणून घ्या सर्व फीचर्स