मला माफ करा, माझी चुकी झाली : राम कदम

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

मला माफ करा, माझी चुकी झाली, असं म्हणत भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्र महिला आयोगााची माफी मागीतली आहे. तसंच भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी हमीही त्यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’861428e6-ba78-11e8-a6e0-43e2a1713049′]

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. त्यानुसार आमदार कदम यांनी आयोगाकडे लेखी खुलासा सादर केला असून आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे.
मी यापूर्वीही महिलांची बिनशर्त माफी मागितली असून महिला आयोगाच्या माध्यमातून माता – भगिनींची बिनशर्त माफी मागत असताना आयोगाला एवढेच आश्वस्त करू इच्छितो की आई-वडील हे साक्षात परमेश्वर आहेत आणि प्रत्येक स्त्री साक्षात लक्ष्मी आहे, हा संदेश  रुजविण्यासाठी  मी प्रयत्न करीत राहीन,” असे आमदार कदम यांनी खुलाशात नमूद केले आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d169828-ba78-11e8-b23a-fb40aae81bd2′]
दरम्यान, ज्यांना एखादी मुलगी आवडत असेल, तीचा त्या प्रेमाला नकार असेल अगोदर तुमच्या आई-वडिलांना माझ्याकडे घेऊन या, त्यांना पसंत असेल तर त्या मुलीला उचलून तुम्हाला आणून देईल, असं वादग्रस्त वक्तव्य  राम कदमांनी घाटकोपरमधील दहिहंडी उत्सवामध्ये केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका झाली होती. तसंच त्यांना महिला आयोगाने नोटीस बजावली होती.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.