ICC च्या ‘या’ एका निर्णयामुळे ३० क्रिकेटरचे ‘करियर’ धोक्यात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे झिम्बाब्वे कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकणार नाही. लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयसीसीने या निर्णयाची घोषणा केली. झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे याआधी देखील आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला इशारा दिला होता. मात्र त्यानंतर देखील सरकारी हस्तक्षेप कमी न झाल्याने आयसीसीने अखेर हा निर्णय घेतला. मात्र आयसीसीच्या या निर्णयामुळे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीवर विराम लागणार आहे. काही खेळाडूंनी यावर आपलं नाराजगी दर्शवत आपण याप्रकारे आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छित नसल्याचे म्हटले आहे.

आयसीसीने यासंदर्भात निर्णय घेताना म्हटले होते कि, कोणत्याही सदस्याला निलंबित करण्याचा निर्णय आम्ही असाच घेत नाही. मात्र, खेळात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. झिम्बाब्वेत जे काही झालं ते आयसीसीच्या नियमाला धरून नव्हतं. त्यामुळे आम्ही या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आयसीसीच्या या निर्णयानंतर संघातील खेळाडूंमध्ये निराशा पसरली असून संघातील वरिष्ठ खेळाडू सिकंदर रजा याने ट्विट करत म्हटले कि, या निर्णयामुळे खूप लोकं बेरोजगार होणार आहेत. याचाच परिणाम त्यांच्या कुटुंबावर देखील होणार असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन टेलर याने देखील ट्विट करत निर्णयावर दुःख व्यक्त केले आहे.

https://twitter.com/BrendanTaylor86/status/1151927656625123328

या निर्णयाचा फटका संपूर्ण क्रिकेट बोर्डाला बसणार आहे. मात्र त्याबरोबरच सर्वात जास्त फटका हा संघातील ३० खेळाडूंना बसणार आहे. या सर्व खेळाडूंची कारकीर्द या निर्णयामुळे संकटात आली आहे. त्यामुळे या सर्व खेळाडूंचे अंतरराष्ट्रीय करियर जवळपास संपल्यात जमा आहे. दरम्यान, पुढील वर्षी जानेवारी महिन्यात झिम्बाब्वे ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार होती. मात्र आता या निर्णयामुळे या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.

या ३० खेळाडूंचे भवितव्य धोक्यात

रोची, तिरिपानो, चकाबवा, चिभाभा, क्रिस इर्विन, मरुमा, मसवाउरे, पीटर मूर, मुसाकांडा, ए. एनदोल्वु, सिकंदर रजा, सीन विलियम्स, ब्रेंडन चारी, एल्टन चिगुंबुरा, जरविस, हॅमिल्टन मसाकद्जा, मावुता, मोफू, मुतुमबामी, नगारावा, ब्रेंडन टेलर, झुवाओआरपी बर्ल, तेंडाई चतारा, टीएस कामुनहुकाम्वे, डब्‍ल्यू मसाकद्जा, मायर, मुजाराबानी.
https://twitter.com/SRazaB24/status/1151927173827239936