मी पैसे कमवण्यासाठी अभिनेता झालो नाही ; राजकुमार राव

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता राजकुमार रावसाठी मागील वर्ष खऱ्या अर्थाने लकी ठरलं आहे. ‘ए लिस्ट अक्टर्स’ यादीत राजकुमार रावचं नाव आलं आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे परिणामी त्याचे मानधन वाढणारच. मात्र या गोष्टीवर दिग्दर्शक करण जोहर सोबत अनेकांनी टीका केली. नव्या पिढीचे एक दोन चित्रपट हिट झाले की, त्यांच्या डोक्यात हवा जाते.

त्यांची फी अव्वाच्या सव्वा वाढते, अशी टीका करण जोहरने केली होती. यात करणने राजकुमार राव आणि विकी कौशल यांची नावं ही घेतली. नुकतीच राजकुमार रावची एक मुलाखत झाली. तु तुझं मानधन वाढवलं हे खरं आहे का?, असा थेट प्रश्न या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर मी पैसे कमवण्यासाठी अभिनेता बनलेलो नाही. मी माझ्या कामावर प्रचंड प्रेम करतो आणि म्हणून पैसा माझ्यासाठी गौण आहे, असं त्यानं म्हटलं.

तसंच, आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी माझी स्वत:ची टीम आहे. चित्रपटासाठी मी पैसे घेतोच. पण केवळ पैशांसाठी मी एखादा चित्रपट नाकारला किंवा सोडला, असे कधीच झाले नाही, असंही राजकुमारने सांगितलं.

दरम्यान, येत्या वर्षात राजकुमारचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘मेंटल है क्या’, ‘मेड इन चायना’, ‘तुर्रम खान’ असे अनेक चित्रपट आहेत.