यावेळी तेथे पत्रकारही उपस्थित होते. बर्ट वड्रा यांच्या चौकशीबद्दल उपस्थित पत्रकारांनी प्रियंका गांधी यांना प्रश्न विचारला. यावेळी प्रियंका गांधींनी यावर उत्तर देताना आपण आपल्या कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभ्या असल्याचं सांगितलं.
आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना पटियाळा न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुख्य म्हणजे रॉबर्ट वड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, वड्रा यांना जामिनाबरोबर न्यायालयात एक लाख रुपये भरावे लागणार असल्याचे समजत आहे. शिवाय ६ फेब्रुवारीला चार वाजता त्यांना कोर्टात हजर राहाण्यास सांगण्यात आलं आहे.
स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.ही वड्रा यांच्याशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीने २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ३.५ एकर जमीन ७.५० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन ५८ कोटी रुपयांना विकली आणि ५०९ कोटी रुपये नफा कमाविला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. याशिवाय सुनावणीदरम्यान ईडीने वड्रा यांची परदेशातही संपत्ती असून त्यासाठी त्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या वेळी काँग्रेसचे नेते हुडा हे मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे वड्रा यांनी यापूर्वीच या आरोपांचे खंडन केले आहे असेही समजत आहे. शिवाय त्या बदल्यामध्ये राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करून डीएलएफला ३५० एकर जागा मंजूर केली, असा पोलिसांचा दावा आहे.