अबब ! टाईल्स व्यावसायिकाकडे सापडले 8 कोटींचे ‘घबाड’

चेन्नई : चेन्नई येथील एका टाईल्स आणि सेनेटरीवेअरच्या उद्योगातील एका कंपनीवर आय टी विभागाने छापा घातला. त्यात कंपनीत तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.

प्रत्यक्ष कर विभागाने तामिळनाडु, गुजरात आणि कोलकत्ता येथील ११ ठिकाणी छापे घातले तसेच ९ ठिकाणी सर्व्हे करण्यात आला. टाईल्स आणि सेनेटरीवेअरमधील या ग्रुपच्या वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यात आय टी विभागाला मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी व्यवहारांची कागदपत्रे मिळाली आहेत. तसेच या ठिकाणी तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची रोकड ठेवण्यात आली असल्याचे आढळून आली. आय टी विभागाने ही रोकड जप्त केली असल्याचे प्रत्यक्ष कर विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.