सन्मानजनक ! १९६२ पासून ११ वेळा आमदारकी जिंकलेल्या गणपतराव देशमुखांची विधानसभा निवडणूकीतून माघार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ५० वर्षाहून अधिक काळ सांगोल्याचे प्रतिनिधीत्व करणारे आणि शेकापचे विधानसभेतील एकमेव आमदार गणपतराव देशमुख यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाढत्या वयामुळे आणि शरीर साथ देत नसल्याने २०१९ ची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत शेकापला नवा उमेदवार द्यावा लागणार आहे.

सांगोल्याचे प्रतिनिधीत्व करणारे गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोला शेकापचा बालेकिल्ला झाला आहे. जनतेने मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल जनतेचा आभारी आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीतही शेतकरी कामगार पक्ष देईल त्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्यांनी विजयी करुन सांगोला शेकापचा अभेद्य बालेकिल्ला आहे सिद्ध करुन दाखवावे असे आवाहन गणपतराव देशमुख यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये शेकापला मदत केल्याचे त्यांनी सांगितले. १९५२ पासून सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीने २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडे उमेदवारीची मागणी करत असली तरी या बाबत मी वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही. शेकापचे पदाधिकारी आणि कार्य़कर्ते राष्ट्रवादीला उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय घेतील असे गणपतराव देशमुख यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –