पाकिस्तानी F-16 विमानाला ‘नेस्तनाभूत’ करणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन यांना ‘वीर चक्र’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायु सेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना स्वातंत्र्य दिवसानिमित्त वीर चक्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यासोबतच स्काऊडन लीडर मिन्टी अग्रवाल यांनी युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेली चकमक सर्व जगाला न्यात आहे.

काय झाले होते नेमके २७ फेब्रुवारी रोजी –
अभिनंदन ने २७ फेब्रुवारीला मिग-२१ बिसनने पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांचा पाठलाग करून एक विमान पाडले होते. त्यानंतर दुसऱ्या एका विमानाने सोडलेले मिसाईल लागल्यामुळे कमांडरला हवेतच विमान सोडून द्यावे लागले होते आणि पाकिस्तानच्या हद्दीत उतरावे लागले होते.नंतर भारताच्या दबावामुळे पाकिस्तानला अभिनंदन वर्धमान यांना सोडून द्यावे लागले होते. पाकिस्तानच्या सैनिकांनी अभिनंदनला अटक केली होती मात्र ६० तासाच्या आत अभिनंदनला वाघा बॉर्डरवरून भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते. वीर चक्र हा भारतात युद्धामध्ये दिला जाणारा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.

मेडिकल बोर्डाने पुन्हा परवानगी दिल्यामुळे आता अभिनंदन पुन्हा एकदा मिग २१ फायटर प्लेन उडवताना दिसून येणार आहे. आईएएफ बेंगलुरुच्या  इंस्टिट्यूट ऑफ ऐरोस्पेस मेडिसिन ने अभिनंदनला पुन्हा फायटर प्लेन चालवण्याची अनुमती दिली आहे. ज्यासाठी अभिनंदनला एक मेडिकल टेस्ट द्यावी लागली ज्यामध्ये ते पास झाले आहेत आणि लवकरच फायटर प्लेन उडवणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त