IAS Rajendra Bhosale | सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार – नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले

IAS Rajendra Bhosale | Newly appointed municipal commissioner Dr. Rajendra Bhosale will work keeping common citizens at the center

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Rajendra Bhosale | पुणे महानगर पालिकेमध्ये Pune Municipal Corporation (PMC) सध्या लोकप्रतिनिधी नसल्याने थेट सर्वसामान्य नागरिकांशी संवाद वाढवून, त्यांचा सहभाग घेऊन कामकाज चालवणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे. एकाच कामासाठी नागरिकांची वेगवेगळी तक्रार येणार नाही याकडे लक्ष देणार आहे, असे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार डॉ. राजेंद्र भोसले यांनी विक्रम कुमार यांचे कडून आज (शनिवार) स्वीकारला. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे आणि विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही माहिती दिली.

आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणले, शहरातील नागरिकांना अनेक वेगवेगळ्या समस्या जाणवतात. त्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मनपाच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना केल्या जातील. तसेच परिमंडळ उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आपण स्वत: नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार आहे. यासाठी पालिकेच्या यंत्रणेतील समन्वय वाढवण्यावर भर देणार आहे. तसेच लोकशाही दिन अधिक प्रभावी राबवणार असून पालिकेच्या तक्रार यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या मी महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करत आहे.
वेगेवेगळ्या विभागप्रमुखांसोबत सविस्तर चर्चा करुन प्रकल्पांची माहिती जाणून घेणार आहे.
आचारसंहिता सुरु झाली असली तरी, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांना कोणतीही अडचण येणार नाही.
सध्या सुरु असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे याला आपले प्राधान्य असेल.
याशिवाय शहरातील मोकळ्या जागा, अ‍ॅमेनिटी स्पेसचा योग्य वापर, पालिकेच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास आदी
गोष्टी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन, असेही आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना