IAS Tina Dabi-IAS Pradeep Gawande Marriage | ‘बाबासाहेबांचा फोटो बघून छान वाटलं’ ! IAS टीना डाबी झाली महाराष्ट्राची सून; विवाहाचे फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IAS Tina Dabi-IAS Pradeep Gawande Marriage | आयएएस अधिकारी टीना डाबी (IAS Tina Dabi) आता महाराष्ट्राची सून झाली आहे. टीना डाबी आणि आयएएस प्रदीप गवांडे (IAS Pradeep Gawande) विवाह (Marriage) बंधनात अडकले आहेत. दोंघाचा विवाह झाल्याने सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे. त्यांच्या विवाहाचे फोटो आता प्रसारित झाले आहेत. जयपुरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह पार पडला. प्रसारित झालेल्या फोटोत टीना आणि प्रदीप पांढऱ्या पोशाखात एक – दूसऱ्यांच्या समोर उभे आहेत. (IAS Tina Dabi-IAS Pradeep Gawande Marriage)

 

ते एकमेकांसमोर उभे आहेत. फोटोमध्ये प्रदीप आणि टीना हे गळ्यात हार घातलेले दिसत आहेत. तसेच लोक त्यांच्यावर फूलं टाकत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो आहे. याबाबतचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. सोशल मिडियावर या आयएएस नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याचबरोबर अनेकांचे लक्ष तिथे असणाऱ्या बाबासाहेबांच्या फोटोकडे जात आहे. तर, ”बाबासाहेबांचा फोटो पाहून आनंद झाला.” असं एकाने लिहिलं आहे.

 

दरम्यान, 2015 साली युपीएससी (UPSC Exam) मध्ये टीना डाबी टाॅप आल्यानंतर ती जातीवरून चांगलीच चर्चेत आली होती.
त्यानंतर तीने अनेक दलितांना पाठिंबा दिला.
तसेच त्यांच्या बाजुने बोलताना दिसत होती. त्याचबरोबर तिने एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हटले होते की, प्रदीप तिच्यासारखाच एससी समुदायातून येतो.
दरम्यान याच्याआधीच तिने आपल्या लग्नासंदर्भात स्वत: माहिती दिली होती.
तर, याबद्दलची माहिती इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केली होती. खरंतर टीनाने प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर देखील केलाय.

त्या फोटोतून टीनाने कॅप्शन दिले आहे की, ‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’,
अशा कॅप्शनसह टीनाने प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.
2016 च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीने 2018 साली अतहर आमिर (Athar Aamir) सोबत निकाह केला.
परंतु त्या दोघांचा संसार अधिक काळ चालला नाही. त्यानंतर टीना आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे.

 

Web Title :- IAS Tina Dabi-IAS Pradeep Gawande Marriage | ias officer tina dabi got married to fellow officer ias dr pradeep gawande of latur district of maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा