ICC World Cup 2019 : शमीची हॅट्रिकसह महत्वाची कामगिरी पण सामनावीर ठरला ‘हा’ खेळाडू

लंडन : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये काल शनिवारी २२ जून रोजी रंगलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ११ धावांनी हरवले. भारताच्या या विजयाचा नायक ठरला हॅट्रिक करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मी. परंतु शेवटच्या षटकात हॅट्रिक करून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही.

शमीने ९.५ ओव्हरमध्ये ४० धावा देऊन ४ गडी बाद करून विजयात महत्वाची भूमिका बजावली असली तरी सामनावीराचा पुरस्कार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देण्यात आला. बुमराहने १० ओव्हरमध्ये ३९ धावा देऊन २ गडी बाद केले होते. चला तर मग जाणून घेऊया शम्मीला वगळून बुमराहला सामनावीराचा पुरस्कार का देण्यात आला ?

बुमराह ने फिरवला सामना –

मोहम्मद शमीने जरी ४ गडी बाद केले असले तरी या सामन्याचे पारडे जसप्रीत बुमराहने फिरवले. एका वेळी अफगाणिस्तानचा संघ २ बाद १०६ धावा अशा मजबूत स्थितीमध्ये होता. अशी मजबूत परिस्थिती असताना जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानची ही मजबूत स्थिती कमकुवत केली. बुमराहने पहिल्यांदा रहमत शहा याला एका उसळत्या चेंडूवर यजुवेंद्र चहेलकडे झेल देण्यास भाग पाडले. दोन चेंडूनंतर बुमराहने हशमतुल्लाह शाहिदी देखील बाद केले. एकाच षटकात बुमराहने हे दोन गडी बाद केल्यामुळे सामन्याचे रूपच पालटले. सामना भारताच्या बाजूने झुकला. बुमराहने विजयाचा पाया रचला आणि शमीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

शेवटच्या षटकांत जबरदस्त गोलंदाजी –

बुमराहने १० षटकात ३९ धावा दिल्या आणि महत्वपूर्ण दोन गडी बाद केले. त्याने ६० चेंडूत फक्त एक षटकार आणि दोन चौकार दिले. बुमराहने पूर्ण सामन्यात एकही वाईड बॉल आणि नो बॉल फेकला नाही. ४९ व्या षटकात जेव्हा अफगाणिस्तानला १२ चेंडूत २१ धावा पाहिजे होत्या तेव्हा बुमराहने ४९ व्या षटकात फक्त ५ धावा दिल्या. मोठी गोष्ट ही आहे की बुमराहने प्रत्येक चेंडू यॉर्कर फेकला ज्यामुळे अफगाणिस्तानच्या फलंदाजांना एकही चौकार मारता आला नाही.

सिने जगत –
‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’