ICC World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणारे ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर सर्वांत ‘श्रीमंत’

लंडन : वृत्तसंस्था – विश्वकप २०१९ स्पर्धेला काल सुरुवात झाली. काल झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. या स्पर्धेत एकूण १० संघानी सहभाग घेतला असून प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध ९ सामने खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेत सर्वात वर असणारे ४ संघ सेमीफायनल मध्ये खेळातील. या खेळातून मिळणाऱ्या सन्मानाप्रमाणेच खेळाडूंना पैसे देखील मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे अनेक खेळाडू म्हणजेच या क्रिकेटर्संकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. जाणून घेऊया, असे कोण दोन खेळाडू आहेत ज्यांची कमाई अन्य दहा टीमच्या खेळाडूंना मागे टाकते.

अन्य देशांच्या तुलनेत भारतात क्रिकेटर्सना जास्त पैसा आणि प्रसिद्धी मिळते. त्यामुळे जगभरातील श्रीमंत क्रिकेटर्समध्ये भारतातील दोन मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. तर चला जणूं घेऊया ‘या’ दोन खेळाडूंबद्दल

Image result for virat kohli

१) विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा विराट कोहली भारताबरोबरच जगभरात देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. फोर्ब्सच्या २०१८ मध्ये सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचं नाव आहे. विराटची कमाई २.४ कोटी डॉलर (जवळपास १६७.५७ कोटी रूपये) असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे त्याची वार्षिक कमाई ९.२ कोटी डॉलर असल्याचे बोलले जात आहे. विराट कोहली एमआरएफ, पूमा, कोलगेट, उबर या कंपन्यांच्या सध्या जाहिरात करत आहे.

Image result for mahendra singh dhoni

२) महेंद्रसिंग धोनी

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. महेंद्र सिंग धोनी बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रैक्ट लिस्टचा भाग आहे. त्याचप्रमाणे तो काही जाहिराती देखील करतो. महेंद्रसिंग धोनीची वार्षिक कमाई ७ कोटी डॉलर असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरॊबर धोनी सोनाटा, टीव्हीएस मोटर्स अशा कंपनींसाठी काम करतो. धोनी माही रेसिंग टीम इंडिया आणि रांची रेज सारख्या टीमचा को-ओनर सुद्धा आहे.