ICC World Cup 2019 : मॅचपुर्वीच विराट कोहलीकडून न्युझीलंडला ‘गर्भित’ इशारा ; म्हणाला, आम्हाला फरक पडत नाही

इंग्लंड : वृत्तसंस्था – आयसीसी विश्व चषकाच्या स्पर्धेतील गुणफलकावर भारतीय संघाने अव्वल क्रमांक गाठला आहे. श्रीलंकेविरोधात झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर दमदार विजय मिळवला आणि सेमीफाइनलमध्ये भारतीय संघाने स्थान मिळवले आहे. सेमीफाइनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. सध्या भारताने एकूण ९ सामने झाले आहेत. त्यातील सात सामन्यात भारताला विजयश्री मिळाली आहे. तर १ सामन्यात इंग्लंडसमोर पराभव पत्करावा लागला होता. तर न्युझीलंडविरुद्धचा १ सामना पावसामूळे रद्द झाला होता. एकंदर पाहता यंदा विश्व चषकातील भारताची कामगिरी ही उत्तम ठरली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा स्वतः भारतीय खेळाडूंच्या खेळावर इम्प्रेस झाला आहे. आम्ही या स्पर्धेत ७ सामने जिंकू आणि १ हरू असे अजिबात वाटले नव्हते, असं कोहलीने म्हटलं आहे. आम्हाला चांगला खेळ करायचा होता. सेमीफायनलमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. त्यातही आम्ही फक्त एकाच पराभवाचा सामना केला आहे. त्यातूनही आम्ही खूप शिकलो आहोत. यामुळे आम्हाला फक्त स्वतःचा खेळ चांगला करण्यावर भर द्यायचा आहे. ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे. याचा आम्हाला फरक पडत नाही, आम्ही फक्त आमचा खेळ चांगला खेळणार, असं विराटने यावेळी म्हटलं.

दरम्यान, आतापर्यंत या विश्व चषकाच्या सामन्यात न्यूझीलंडशी एक रद्द झाला होता. त्यानंतर न्यूझीलंड आणि भारत समोरा-समोर येत आहेत. त्यामुळे हा सामना या दोन्ही संघांचा परस्पर विरोधी पहिलाच सामना असणार आहे.

दरम्यान, ४४ वर्षांनंतर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ मँचेस्टरच्या मैदानावर आमने-सामने येणार आहेत. १९७५मध्ये मँचेस्टरच्या मैदानावर दोन्ही संघ खेळले होते. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. त्यातील भारताने ३ तर न्यूझीलंडने ४ सामने जिंकले आहेत. तर सध्याच्या गुणतालिकेत न्यूझीलंड ४ स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडनं ५ सामने जिंकले आहेत तर, ३ सामन्यात त्यांना पराभव झाला आहे. त्यामुळे सेमीफाइनलमध्ये कोण कोणावर भारी पडणार हे पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’च्या नाऱ्याचा वापर : अमर्त्य सेन

मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा न्यायालयात आव्हान !

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

 कर्नाटकातील सन्नतीला बौद्ध क्षेत्र घोषित करावे