अंतिम सामन्यात ११ खेळाडू निलंबित, वर्ल्डकप फायनल न खेळताच संघ घरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमध्ये अनेकदा नियमभंग केल्याने खेळाडूंना निलंबित करण्यात येते. मात्र काहीवेळा अशा विचित्र घटना घडतात कि त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. अशाच प्रकारची घटना २०२० मध्ये होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी क्वालिफायरच्या अंतिम सामन्यात घडली. जपान हा अंतिम सामना ना खेळताच २०२० मध्ये होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला.

या स्पर्धेचा अंतिम सामना हा जपान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार होता. मात्र या सामन्याआधी पापुआ न्यू गिनीच्या ११ खेळाडूंना निलंबित करण्यात आल्याने हा सामना खेळवण्यात आला नाही. त्यामुळे सामना न खेळताच जपानचा संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला. परंतु या खेळाडूंवर कोणत्या कारणांमुळे हि कारवाई करण्यात आली याची माहिती मिळू शकलेली नाही.

या स्पर्धेत पापुआ न्यू गिनीने सातत्य राखत करत आतापर्यंत ९ पैकी ८ वेळा हि स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र यावेळी त्यांना अंतिम सामना खेळता न आल्यामुळे या यावेळी त्यांच्या या विजयात खंड पडला. त्यामुळे जपानला पहिल्यांदा विजेतेपद मिळवण्याची संधी मिळाली.

दरम्यान, जपान १९९६ पासून आयसीसीचा असोसिएट मेम्बर असून त्यांनी हि कामगिरी करताना पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत प्रवेश केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

Loading...
You might also like