पावसाचा खेळ ! भारत आणि इंग्लंडमधील सामना ‘रद्द’, इंडियाची पहिल्यांदाच फायनलमध्ये ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला संघ टी-20 वर्ल्डकप जिंकण्यापासून आता केवळ एक पाऊलं दूर आहे. आज भारत विरुद्ध इंग्लड असा सेमीफायनल सामना होणार होता, मात्र पाऊस आल्याने हा सामना रद्द करावा लागला. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द झाला. त्यामुळे आयसीसीच्या नियमामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा फायनलमध्ये उतरण्यात टीम इंडिया सज्ज आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने ७ वर्षात एकदाही टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेला नाही. भारताचा फायनलमध्ये सामना ऑस्ट्रेलियाशी किंवा दक्षिण आफ्रिका संघाशी होणार आहे.

भारताने ग्रुप स्टेजमध्ये चारही सामन्यात विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजमधली कामगिरी भारतासाठी फायद्याची ठरली. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर होता, त्यामुळं भारताने थेट फायनलमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनंसुद्धा एकही सामना गमावला नाही. त्यामुळे त्यांनाही सेमीफायनलमध्ये सामना रद्द झाल्यास फायदा होईल.

भारतीय खेळाडू : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शफाली वर्मा, स्मृती मानधना, शिखा पांडे, हरलीन देवल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, पूजा वस्त्रकार.

इंग्लड : हीदर नाइट (कर्णधार), कॅथरिन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेव्हिस, सोफी एस्सेलस्टोन, जॉर्जिया एल्विस, टॅमी ब्यूमाँट, अ‍ॅन्या श्रबसूल, मॅडी व्हिलियर्स, फ्रॅन विल्सन, लॉरेन विनफिल्ड, डॅनी याट, सारा ग्लेन, अ‍ॅमी जोन्स, नताली शिव्हर.