भारतीय संघ फक्त ‘या’ संघासमोर हरणार, स्फोटक फलंदाजाची भविष्यवाणी

लंडन : वृत्तसंस्था – विश्वकप २०१९ ला सुरुवात झाली असून सगळेच संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे सगळेच जण यंदाचा वर्ल्ड कप कोण उंचावणार? उपांत्य फेरीत कोणते चार संघ प्रवेश करणार? कोण असेल सर्वोत्तम खेळाडू? अशा अनेक प्रशांवर विचार करण्यात मग्न आहेत. तर काही खेळाडू यावर प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत.

मात्र या सगळ्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि खेळाडू ब्रेंडन मॅकलमने एक पाऊल पुढे टाकत या सगळ्याचे विश्लेषण करण्याबरोबरच कोण जिंकणार याचे देखील भाकीत वर्तवले आहे. आणि या सगळ्याची नोंद त्याने एका डायरीमध्ये ठेवली आहे.

मॅकलमने यजमान इंग्लंडसह भारत आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम चारमध्ये प्रवेश करणारे संघ असतील, तर चौथ्या स्थानाचा फैसला हा नेट रन रेटवर होईल, असे भाकित केले आहे. तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ झालेली पाहायला मिळेल असा अंदाज त्याने वर्तवला आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे दोन संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असतील असे देखील त्याने म्हटले आहे.

दरम्यान, भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सर्वात जास्त सामने जिंकून अनुक्रमे एक, दोन आणि तिसऱ्या क्रमांकावर असतील, असेदेखील भाकीत त्याने वर्तवले आहे. त्यामुळे आता त्याचे भाकीत किती खरे ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.