‘या’ कारणामुळे सानिया मिर्झा झाली ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने मिळवलेल्या विजयानंतर भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हीने आपला पती आणि पाकिस्तानचा खेळाडू शोऐब मलिक याचे अभिनंदन केल्यानंतर सोशल मीडियात तीला मोठ्या प्रमाणात ट्राेल करण्यात आले.

काल वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर १४ धावांनी विजय मिळवत आपले खाते खोलले. त्यानंतर तिने आपला पती शोएब मलिक याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या, मात्र त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात सुरुवात केली. यासंबंधी ट्विटमध्ये सानियाने लिहिले होते कि, “पाकिस्तानच्या संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. कोणालाही अंदाज नसताना तुम्ही ज्या पद्धतीचा विजय मिळवलात, त्यासाठी तुमचे अभिनंदन !!! आता क्रिकेट विश्वचषक अधिक रंजक झाला आहे”, असे ट्विट सानियाने केले आहे.

यावर नेटिझन्सनी तिला ट्रोल करत म्हटले कि, १६ जूनला तू कुणाला सपोर्ट करणार आहे. तर एकाने म्हटले आहे कि, काहीही कर, हरवणार तर आम्हीच आहोत तुम्हाला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सामना हा नेहमी टक्करचा होत असतो, त्यामुळे सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागून आहे. विंडीजविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानने काल केलेल्या दमदार वापसीमुळे सर्वांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे लागून आहे.