Advt.

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपचे ‘हे’ ५ टॉप गोलंदाज, जसप्रीत बुमराह ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये काल झालेल्या फायनल सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत इतिहास रचला. वर्ल्डकपच्या ४९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा इंग्लंडने विजेतेपद पटकावले. अतिशय थरारक आणि रोमहर्षक सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सामना आणि सुपर ओव्हर देखील टाय झाल्यानंतर इंग्लंडने बाउंड्रीच्या बळावर मिळवला. त्याचबरोबर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला मालिकावीराचा ‘किताब देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वात जास्त विकेट आणि धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या दोन्ही विभागात दमदार कामगिरी भारतीय खेळाडुने केली. मात्र सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.

या पाच गोलंदाजांनी गाजवला वर्ल्डकप चला पाहुयात

१)मिचेल स्टार्क

Related image

ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेत विरोधी संघाच्या नाकीनऊ आणले. आपल्या धारधार यॉर्कर्सच्या बळावर त्याने १० सामन्यात २७ विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध २६ धावांत ५ विकेट हि त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. सेमीफायनलमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.

२)ल्युकी फर्ग्युसन

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ९ सामन्यांत २१ विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध ३७ धावांत ४ विकेट हि त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

३)जोफ्रा आर्चर

इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने विरोधी संघाला सळो कि पळो करून सोडले. या स्पर्धेत त्याने ११ सामन्यांत २० विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने २७ धावांत ३ विकेट घेत आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती.

४) मुश्ताफीजूर रेहमान


बांग्लादेशच्या या वेगवान गोलंदाजाने या स्पर्धेत ८ सामन्यात २० विकेट घेतल्या. भारताविरुद्ध त्याने ५९ धावांत ५ विकेट घेत आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली होती.

५)जसप्रीत बुमराह

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या स्पर्धेत भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी पार पाडत संपूर्ण स्पर्धेत ८ सामन्यात १८ विकेट घेतल्या. बांगलादेशविरुद्ध त्याने ५५ धावांत ४ विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी पार पडली होती. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज