ICC World Cup 2019 : सट्टेबाजांचं भाकित, म्हणाले ‘हा’ संघ वर्ल्डकप जिंकणारच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील साखळी सामन्यांमध्ये नऊपैकी सात सामने जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारणारा भारताचा संघ हा सट्टेबाजांच्या नजरेत आयसीसी क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. साखळी सामन्यांत भारतीय संघाने सात सामने जिंकून गुणतालिकेत देखील पहिलं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून सगळ्यांनाच खूप आशा आहेत. लीग सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला होता. मात्र आता सट्टेबाजांनी भारतीय संघ या सामन्यात विजेता होऊन सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या वर्ल्डकपच्या विजेतेपदाचा देखील भारत प्रबळ दावेदार असल्याचे सट्टेबाजांनी म्हटले आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी देखील भारतीय संघ या सामन्यात फेव्हरेट संघ मानला जात आहे.

सट्टाबाजारात लैडब्रोक्स या कंपनीने भारतीय संघाचा १३/८ असा भाव ठेवला आहे. तर इंग्लडचा १५/८, ऑस्ट्रेलियाचा ११/४ आणि न्यूझीलंडचा ८/१ असा भाव ठेवला आहे. त्यामुळेच भारतीय संघावर जास्त भाव लागल्याने सट्टाबाजारत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. तर दुसरी साट्टाबाजारातील कंपनी बेटवे हिने भारताला २. ८ असा भाव दिला आहे. त्याचप्रमाणे दुसरे संघ म्हणजे इंग्लंडला ३, ऑस्ट्रेलियाला ३. ८ तर न्यूझीलंडला ९. ५ असा भाव दिलेला आहे. त्यामुळे सट्टाबाजारात भारत फेव्हरेट असून न्यूझीलंडला या सामन्यात विचारात देखील घेण्यात न आल्याने न्यूझीलंड जवळपास या सामन्यात पराभूत झाल्याचेच चित्र दिसत आहे.

दरम्यान, सट्टाबाजारात भारतीय संघच जिंकणार असे चित्र दिसत असले तरी आजच्या सामन्यात प्रत्यक्ष मैदानावर कोण कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई