ICC World Cup 2023 | यंदाचा वर्ल्डकप भारतानेच जिंकावा, धोनीचे ग्रामदैवताला साकडे, तब्बल २० वर्षानंतर पत्नीसह गेला मूळ गावी

अल्मोडा : ICC World Cup 2023 | टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा त्याची पत्नी साक्षीसह बुधवारी जैती तालुक्यातील त्याच्या मूळ गावी ल्वाली (जिल्हा अल्मोडा) येथे पोहोचला. यावेळी धोनी आणि साक्षीने गावातील मंदिरात प्रार्थना केली. २०२३ चा वर्ल्ड कप (ICC World Cup 2023) खेळणाऱ्या टीम इंडियासाठी (Team India) त्याने हवनही केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार हवन करताना दिसत आहे.

भाऊबीजेला धोनीने पत्नीसह मूळ गावाला भेट दिली. यावेळी, त्याने बालपणीच्या मित्रांच्या गाठीभेटी घेतल्या. धोनी तब्बल २० वर्षांनंतर ल्वाली या मूळ गावी आला.

धोनीने गावातील लोकांची प्रेमाने चौकशी केली. अनेकांच्या भेटी घेतल्या. तसेच गावचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यंदाचा वर्ल्डकप भारतानेच जिंकावा, यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली. यावेळी, त्याच्यासोबत पत्नी साक्षी आणि माहीचे गावातील जुने मित्र उपस्थित होते. (ICC World Cup 2023)

यावेळी धोनीने गावातील तरुणांना क्रिकेटच्या टिप्सही दिल्या. गावातील वृद्ध आणि महिला भगिनींसोबतही फोटो काढले.
यावेळी, माही आणि साक्षीला पाहायला ग्रामस्थांनी गर्दी केली होती. माहीने त्यांसोबत फोटो काढले.
गावातील गंगानाथ मंदिर, गोलू देवता, देवी माता आणि नरसिंह मंदिरातही धोनीने पूजा-आरती करुन देवाला साकडे घातले.

ल्वाली गाव डांबरी रस्त्यापासून दूर असल्याने चायखान-बचकांडे येथे कार थांबवून माही व साक्षी गावात पोहोचले.
गावी जाण्यासाठी १ किमीपर्यंत चालत जावे लागत असल्याने माहीने मुलगी जिवा हिस गावी आणले नाही.
धोनी म्हणाला, जिवा थोडी मोठी झाल्यानंतर आणखी ३-४ वर्षांनी पुन्हा एकदा गावी येईन.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शहरातील 26 रूफ-टॉप हॉटेल्सना जिल्हाधिकार्‍यांनी बजाविली नोटीस