Notice To Rooftop Hotels In Pune | शहरातील 26 रूफ-टॉप हॉटेल्सना जिल्हाधिकार्‍यांनी बजाविली नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Notice To Rooftop Hotels In Pune | शहरात महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बांधकाम नियंत्रण नियमावलीला हरताळ फासत; उंच इमारतींच्या हॉटेलवर शेड टाकून धोकादायक स्वरुपात सुरू असलेल्या २६ रूफटॉप हॉटेलला जिल्हाधिकार्‍यांकडून (Notice To Rooftop Hotels In Pune) नेमण्यात आलेल्या पथकाने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. या हॉटेलसाठी परवाना वेगळया जागेचा घेऊन रूफटॉपवर हॉटेल सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरातील अशा हॉटेलवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अशा हॉटेलवर कारवाई करा, असे आदेश दिले. मात्र, अनेक हॉटेलचालकांनी अशा रुफ टॉपफसाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांची परवानगी घेतलेली आहे. त्यामुळे कारवाईत अडथळे येत असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी महापालिकेने केली होती. मात्र, ही बैठक झालेली नसली उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाकडून अशा हॉटेलच्या तपासणीसाठी जिल्हाधिकार्‍यांनी पथक नेमले असून या पथकाने आता पर्यंत २६ हॉटेलला नोटीस बजाविली आहे. त्यानुसार, त्यांना नियमभंग झाल्याने परवाना रद्द का करू नये अशी विचारणा करण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले. (Notice To Rooftop Hotels In Pune)

महापालिकेला एनओसीचे अधिकार

रूफटॉप वर हॉटेल उभारण्यास बंदी असली तरी या हॉटेलला उत्पादन शुल्क विभाग व पोलिस परवानगी देतात.
मात्र, संबधित हॉटेलसाठीची जागा अधिकृत आहे की नाही याची खातरजमा हे दोन्ही विभाग करत नाही.
त्यामुळे, अनधिकृतपणे नियमभंग करून हॉटेल सुरू असल्यास महापालिका कारवाईची नोटीस
बजावते अथवा कारवाई सुरू करते तेव्हा या दोन्ही विभागांचा परवाना महापालिकेस दाखविला जातो.
त्यामुळे महापालिकेस कारवाईत अडथळे येतात.
त्यामुळे या तीन्ही विभागांमध्ये समन्वयं ठेवून अशा प्रस्तावांसाठी
आता महापालिकेचीही एनओसी घेतली जाणार असून त्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Stamp Duty & GST | समाविष्ट 34 गावांतील मुद्रांक शुल्क व जीएसटीच्या हिश्श्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार

Pune PMC Property Tax | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना 40 टक्के कर सवलत देण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत पीटी 3 फॉर्म सादर करण्याची मुदत