इचलकरंजी : दारुला पैसे न दिल्याने मित्रानेच केला मित्राचा खून

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन

इचलकरंजी मध्ये दारुला पैसे न दिल्याने मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. इचलकरंजी येथील दत्तनगरमध्ये शनिवारी (दि.३०) मध्यरात्री ही घटना घडली असून याप्रकरणी मृत युवकाच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B07BSKKZKM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a06de36b-7d03-11e8-af23-e97a16c087eb’]

मिळालेली माहितीनुसार, इचलकरंजीतील विजय जनार्दन सरदेसाई (वय 27) याचा खून मित्रांनीच केल्याचे उघडकीस आले आहे. दारू प्यायला पैसे देत नसल्याच्या कारणातून मित्रांनीच खून केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून रजाक इमाम शेख व इस्माईल आयुब शेख दोघे रा.इचलकरंजी यांना अटक करण्यात आली आहे.