ICICI बँकेचे 2019-20 मध्ये 450 नवीन शाखा उघडण्याचे उद्दिष्ट ; 3,500 लोकांना उपलब्ध होईल रोजगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील आर्थिक मंदीचे संकट चालू असताना खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. चालू आर्थिक वर्षात बँकेने ४५० नवीन शाखा उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या ४५० पैकी ३२० शाखा ग्राहकांसाठी उघडल्या गेल्या असल्याचे बँकेने एक निवेदन जारी केले आहे. यासह बँकेच्या शाखांची संख्या आता ५००० पेक्षा जास्त झाली आहे. उर्वरित १३० शाखा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होतील, असे बँकेने म्हटले आहे.

३,५०० लोकांना मिळणार रोजगार :
बँकेचे कार्यकारी संचालक अनूप बागची म्हणाले की, मार्च २०२० पर्यंत बँकेचे ५,३०० शाखांचे जाळे विकसित करण्याचे उद्दीष्ट आहे. ते म्हणाले की, यासाठी ३,५०० लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील. बागची पुढे म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की रिटेल बँकिंगसाठी शाखांचे मोठे जाळे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देऊन त्यांचे नाते आणखी दृढ होण्यास मदत होते. शाखेचे चांगले जाळे ग्राहकांच्या तारण, बँकिंग, कर्ज आणि गुंतवणूकीशी संबंधित सर्व बँकिंग गरजा भागविण्यास मदत करते.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या काही वर्षांमध्ये बँकांच्या शाखांचे काम करण्याचे प्रकार बरेच बदलले आहेत. आजच्या काळात बहुतेक ग्राहक डिजिटल माध्यमाद्वारे सामान्य व्यवहार करतात पण गुंतागुंतीचे प्रश्न, गुंतवणूकीच्या सूचना समजून घेण्यासाठी मात्र शाखांमध्येच जावे लागते.

मंदीचा ICICI वर परिणाम नाही :
बागची म्हणाले की स्लोडाउनचा त्याच्या बॅंकेवर काही विशेष परिणाम झाला नाही. ते म्हणाले की उलट आयसीआयसीआय बँकेला नवीन शाखेसाठी कमी भाडे द्यावे लागत आहे. आमचा बाजाराचा वाटा दुप्पट आहे आणि आम्ही त्यात वाढ करण्यावर भर देत आहोत. मागणीत कोणतीही मंदी नाही आणि आम्हाला कोणतीही निराशा दिसत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Visit : policenama.com