ICMR चे महासंचालक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत दैनंदिन पातळीवर माध्यमांना माहिती देणारे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसईएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांना कोरोनाची लागण झाली आहे. बलराम भार्गव यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय बलराम भर्गव यांना बुधवारी (दि.16) एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. भार्गव यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे.

बलराम भार्गव हे आयसीएमआरच्या महासंचालकपदासाठी तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्त आहेत. त्यासोबत ते स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आरोग्य संशोधन विभागाचे सचिव देखील आहेत.