ICMR Study : भारतात 30 एप्रिलपर्यंत समोर आले ‘कोरोना’ची लक्षणे नसलेले 28 % रूग्ण

नवी दिल्ली : एका अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे की, 22 जानेवारीपासून 30 एप्रिलदरम्यान समोर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या 40,184 प्रकरणांमधील कमीतकमी 28 टक्के रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. अभ्यासात कमी किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांकडून कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्ती केली आहे.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हे समोर आले आहे की, जे लोक संक्रमित आढळले होते आणि ज्यांची तपासणी केली गेली होती, त्यापैकी बहुतांश रूग्णांमध्ये लक्षणे आढळून आली नाहीत.

इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयजेएमआर) मध्ये प्रकाशित स्टडी रिपोर्टनुसार एकुण संक्रमित रूग्णांमध्ये सुमारे 5.2 टक्के आरोग्य कर्मचारी आहेत. 28.1 टक्के लक्षणे नसलेल्या रूग्णांमध्ये 25.3 टक्के असे रूग्ण होते जे गंभीर धोका असलेल्या रूग्णांच्या थेट संपर्कात आले होते आणि 2.8 टक्के आरोग्य कर्मचारी होते, जे सुरक्षा उपाय योजनांशिवाय रूग्णांच्या संपर्कात होते.

अभ्यासाचा अहवाल तयार करणार्‍यांमध्ये सहभागी आयसीएमआरच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेचे संचालक मनोज मूर्हेकर म्हणाले, परंतु लक्षणे नसलेल्या रूग्णांचे प्रमाण 28.1 टक्के पेक्षा खुप जास्त असू शकते आणि हिच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे.

ते म्हणाले, संक्रमित प्रकरणांमध्ये आरोग्य कर्मचारी, परदेशातून आलेले लोक आणि श्वासाच्या गंभीर रूग्णांच्या प्रमाणापेक्षा लक्षणे नसलेल्या रूग्णांची संख्या दोन ते तीन पट जास्त होती. 22 जानेवारीपासून 30 एप्रिलदरम्यान 10,21,518 लोकांची तपासणी करण्यात आली होती.

अभ्यासानुसार, या दरम्यान संसर्ग झालेल्यांपैकी प्रति 10 लाख लोकसंख्येवर 50-69 वर्षांच्या लोकांची संख्या 63.3 टक्के आणि सर्वात कमी 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची 6.1 टक्के होती.

कोरोना व्हायरसमुळे महिलांपेक्षा पुरूषांना जास्त धोका आहे. संक्रमित आढळलेल्या रूग्णांमध्ये 41.6 टक्के पुरूष आणि 24.3 टक्के महिला होत्या. कोरोना व्हायरस देशाच्या 736 पैकी 523 जिल्ह्यात (71.1 टक्के) पसरला आहे.