IDBI Bank Recruitment 2020 : लेखी परीक्षा न घेता आयडीबीआय बँकेत भरती ! ‘असा’ करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता तुम्हाला इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (Industrial Development Bank of India – IDBI) मध्ये अधिकारी बनण्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) साठी आयडीबीआयनं भरती काढली आहे. पदवीधारक, इंजिनियर आणि सीएचं शिक्षण घेतलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

पदे –
1) डेप्युटी जनलर मॅनेजर (ग्रेड- डी) – 11 पदे
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) – 52 पदे
3) मॅनेजर (ग्रेड- बी)- 62 पदे
4) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए)- 09 पदे
एकूण पदांची संख्या- 134

शैक्षणिक पात्रता-
वेगवेगळ्या पदांसाठी आणि विभागांसाठी वेगवेगळी शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. कोणत्याही विषयातील सामान्य पदवीधारक, बीएससी ऑनर्स, बीकॉम, बीई/बीटेक, एमसीए, मास्टर्स इन कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स व चार्टर्ड अकाऊंटंट यासाठी अर्ज करू शकणार आहेत. कोणत्या पदासाठी कोणती अट आहे यासाठी पुढील नोटीफिकेशन लिंकवर क्लिक करा.

नोटीफिकेशन लिकं –
https://www.idbibank.in/pdf/careers/DetailedAdvertisementSpecialists2020-21.pdf

‘असा’ करा अर्ज
यासाठी उमेदवारांना आयडीबीआय बँकेच्या https://www.idbibank.in/index.asp या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात 24 डिसेंबर 2020 पासून होत आहे. 7 जानेवारी 2021 ही शेवटची तारीख असणार आहे. अर्जसाठी पुढील लिंकवर क्लिक करू शकता.

अर्जासाठी लिंक –
https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.asp

कशी होणार निवड ?
यासाठी अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. यानंतर त्यांना ग्रुप डिस्कस्शन/पर्सनल इंटरव्ह्युसाठी बोलवलं जाणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.