‘इथं’ आधारकार्डचा क्रमांक वापरताना काळजी घ्या, अन्यथा भरावा लागेल 10 हजाराचा दंड, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकरदात्यांसाठी कोणतेही काम सोपे करण्यासाठी आयकर विभागाने पॅन क्रमांकाच्या जागी 12 आकडी आधार क्रमांकाचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. परंतू तुम्ही असे करण्यासाठी गेलात तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कारण जर तुम्ही चुकीचा आधार क्रमांक दिला तर तुम्हाला 10,000 रुपये दंड सोसावा लागेल. अर्थविधेयक 2019 मध्ये आयकर अधिनियम 1961 मध्ये नव्या बदलानुसार पॅनच्या ऐवजी आधार नंबरचा वापर करण्यास मंजुरी दिली, परंतू चुकीचा नंबर दिल्यास 10 हजाराचा दंडाची देखील तरतूद केली आहे.
येथे लागू होईल दंडाचा नियम
हे नवे नियम तेथे लागू होती जेथे पॅन क्रमांकाच्या जागी आधार क्रमांकाचा वापर होईल आणि जेथे आयकर विभागानुसार पॅन क्रमांक अनिवार्य आहे. जसे की आयकर रिटर्न, बॅंक खाते सुरु करणे, 50 हजारापेक्षा जास्तीचा म्यूचुअल फंड आणि बाॅंड खरेदी करायचा असेल तर.
आधार UIDAI कडून देण्यात येतो. परंतू दंड यूआयडीएआयकडून नाही तर आयकर विभागाकडून आकारण्यात येईल. आयकर अधिनियम 1961 चे कलम 272 बी अनुसार जर आयकरदाता पॅनच्या नियमांचे पालन करत नाही तर आयकर विभाग त्याला दंड ठोठावू शकतो. दंडाची रक्कम 10,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. याआधी दंड फक्त पॅनसाठी मर्यादीत होता परंतू आता सप्टेंबरमध्ये पॅन आधार इंटरचेंजिबिलिटीची तरतूद करण्यात आल्यानंतर आधारला हे लागू करण्यात आले आहे.
या प्रसंगी होऊ शकतो दंड
1. जर तुम्ही पॅनला पर्याय असलेल्या आधारचा चुकीचा नंबर दिला तर
2. जर तुम्ही एखाद्या खास ट्रांजेक्शनवेळी पॅन किंवा आधारचा नंबर देण्यास अपात्र ठरलात तर
3. फक्त आधार क्रमांक देऊन भागणार नाही त्याबरोबर बायोमॅट्रिक आयडेंटिटी देखील ऑथेंटिकेट करण्यात येईल. जर यात अपात्र ठरलात तर भरभक्कम दंड ठोठावण्यात येईल.
Visit : Policenama.com
- ‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा
- गरोदर आहात ? सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय ? मग ‘हे’ 5 उपाय करा
- चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ ! नपुंसकतेमुळे अनेकजण त्रस्त
- वजन कमी करण्यासाठी काय करणार ? व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या
- वजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या