राहुल गांधींना पक्ष सांभाळता आला नाही, ते काय देश सांभाळणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेआधी राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, लोकसभेला दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिली होता. तसेच राहुल गांधी यांना त्यांच्या परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये हार पत्करावी लागली होती. यावरून केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

आज रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक मोदींवर टीका करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. जर राहुल गांधींना काँग्रेस सांभाळता आली नाही, तर देश काय सांभाळणार ? याची परिणती अमेठीमध्ये हरण्यामध्ये झाली असे म्हणत आठवले यांनी राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. यामध्ये त्यांनी महायुतीसोबत असल्याचे सांगताना 240 जागांवर युती जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 288 पैकी 40 जागा आरपीआयला देण्याची मागणी नुकतीच केली होती. मात्र, युतीच्या जगावाटपात एवढ्या जागा आरपीआयला सुटण्याची चिन्हे नाहीत. तर एवढ्या जागा मिळून महायुतीतील घटकपक्षांनाही मिळणार नसल्याची स्थिती आहे.

Visit :- policenama.com