पोलीसनामा ऑनलाइन टीम – आता पॅनकार्ड इतके महत्वाचे झाले आहे की कोणत्याही कामासाठी पॅन कार्ड जवळपास आवश्यक बनले आहे. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर ते लगेचच बनवून घ्या. कारण पॅन कार्ड नसल्यास तुमची अनेक कामे अडून राहतील. याशिवाय सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची अंतिम तारिख असल्याचे सांगितले आहे.
१०१ रुपयात पॅन कार्ड
तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर ते तात्काळ बनवून घ्या. कारण पैशाच्या व्यवहारासाठीच नाही तर अनेक महत्वपूर्ण कामासाठी हे महत्वाचे आहे. तसेच पॅन कार्ड काढणे आता फार अवघड राहिले नाही आणि स्वस्त देखील झाले आहे. तुम्ही आता १०१ रुपयात पॅन कार्ड बनवू शकतात. आणि ते देखील काही वेळात. अनेक सरकारी कामात, खासगी कामात आता पॅनकार्ड आवश्यक झाले आहे.
या ठिकाणी पॅन कार्ड दाखवणे आवश्यक आहे
१. बँक खाते – बँक खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही सरकरी किंवा खासगी बँकेत पॅन कार्डच्या माहिती शिवाय खाते सुरु करता येणार नाही. याशिवाय खात्यात ५० हजारापेक्षा आधिक रक्कम जमा करताना बँकेत पॅन डिटेल दाखवणे आवश्यक आहे.याशिवाय क्रेडिट कार्ड बनवताना देखील तुम्हाला पॅनची मदत होईल.
२. वाहन खरेदी करताना आणि विकताना – जर तुम्ही कार खरेदी किंवा विकू इच्छित असाल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला खरेदी विक्री करता येणार नाही. असे असले तरी तुम्ही दुचाकीची पॅन कार्ड शिवाय विक्री करु शकतात.
३. हॉटेलचे बिल पे करताना – जर तुम्ही हॉटेलमध्ये ५०,००० रुपयांपर्यंत बिल भरणार असाल तर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक.
४. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना – शेअर बाजारात गुंतवणूक करताना पॅन कार्ड नंबर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही डी मॅट खाते सुरु करत असाल. किंवा शेअर खरेदी करतात. किंवा कंपनीत १ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करत असल तर तुम्हाला पॅन कार्ड नंबर दाखवणे आवश्यक आहे.
५. विदेशी चलन – दर तुम्ही ५०,००० रुपये विदेशी चलन खरेदी करतात तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवणे आवश्यक आहे.
६. इतर गुंतवणूक – कर घोषित करताना अनेक लोक कर वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक जण ELSS फंडमध्ये गुंतवणूक करतात. अशात जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच ५० हजार किंवा त्यापेक्षा आधिक रुपयांच्या सिक्युरिटीच्या खरेदी देखील पॅन कार्डची माहिती देणे आवश्यक असते.
- नारळाच्या तेलाने काढा मेकअप ; जाणून घ्या, नैसर्गिक मेकअप ‘रिमूव्हर्स’
- ‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या
- कोणत्या पदार्थांमुळे कोणती ‘अॅलर्जी’ ? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय
- त्वचा आणि दातांसाठी घातक ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या कोणते
- ‘यांना’ कॉल केल्यावर तणाव कमी, जाणून घ्या