जर तुम्हीही गाडी चालवताना Google Maps चा वापर करताय ? तर तुम्हाला होईल ‘इतका’ मोठा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाण्यासाठी आपण सध्या आपल्याकडील स्मार्टफोनच्या माध्यमातून इच्छितस्थळी जाण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण Google Maps चा वापर करत असतो. सर्वच कॅब कंपनी Google Maps वर आधारित आहे. या ऍपच्या माध्यमातून बहुतांश जणांचे जाणं-येणं अवलंबून असते. पण आता तुम्ही गाडी चालवताना Google Maps चा वापर केला तर तुमच्यावर होऊ शकते कारवाई.

वाहन चालवताना Google Maps सर्वात चांगला नेविगेटर मानला जातो. या Google Maps च्या माध्यमातून अगदी जलद कोणालाही न विचारता इच्छितस्थळी जाता येते. पण याच Google Maps च्या वापरामुळे वाहतूक पोलिसांकडून तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला दंडही आकारला जाऊ शकतो. तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे हे बेकायदेशीर असून, जर असे करताना कोणताही वाहनचालक आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशी तरतूदच कायद्यात आहे.

डॅशबोर्डवर नव्हता मोबाईल होल्डर

एक व्यक्ती वाहन चालवताना Google Maps चा वापर करत होती. पण त्याची चूक इतकीच की त्याने गाडीच्या डॅशबोर्डवर मोबाईल होल्डर लावले नव्हते आणि हातात फोन घेऊन ड्रायव्हिंग करत होता. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत दंडाची रक्कम वसूल केली.

मोटार वाहन कायद्यात दंडाची तरतूद

दिल्ली पोलिसांनी दंडाच्या पावतीवर गुन्ह्याचे स्वरूप म्हणून use of handheld communication device while driving म्हणजे वाहन चालवताना मोबाईलचा वापर, असे नमूद केले. तसेच नियमभंग केल्यास 1000 ते 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.