पत्नी, मुलगी बहीण आणि आईच्या नावावर घर विकत घेतले तर मिळतील ‘हे’ तीन फायदे, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या आधी घर विकत घेणे बऱ्याच लोकांसाठी दीर्घकालीन आर्थिक लक्ष होते परंतू आज ते प्राधान्य बनले आहे. प्रत्येक व्यवसायिक शक्य तितक्या लवकर स्वतःचे घर विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे लक्षात घेऊन सरकारने महिला घर खरेदीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. टाटा कॅपिटलमधील संपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सौरभ बसू यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितले की घरातील कुटुंबातील एखाद्या महिलेच्या नावे घर नोंदणीकृत असेल तर, एक महिला घर खरेदीदार असेल तर गृहकर्ज आणि मुद्रांकात सवलत मिळेल. याबाबत जाणून घ्या सविस्तर.

या महिलेला मिळतील घर खरेदीदाराचे फायदे
१. जास्तीत जास्त गृहनिर्माण वित्त संस्थांना महिला कर्जदारांच्या व्याज दरात ०.५- ५% पेक्षा कमी दर देण्यात आला आहे. काही गृहनिर्माण वित्त संस्थांनी महिलांसाठी त्यांचा उद्देश आणि उत्पन्नाच्या पातळीनुसार कस्टमाइज्ड कर्ज योजना देखील डिझाईन केल्या आहेत. जेव्हा कर्जाची मूलभूत रक्कम जास्त असते, तेव्हा ०.५-५% सूट देखील महत्वाची असते.

२. महिलेच्या नावे किंवा संयुक्त मालकीचे कर्ज घेऊन कुटुंबाच्या उत्पन्नावर अतिरिक्त कर लाभ मिळू शकतो. जर पत्नीचे उत्पन्नाचे स्रोत भिन्न असतील तर गृहकर्जाच्या हप्त्यांच्या भरपाईवरील कर सूट पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात, त्यामुळे कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक न करता कराचे फायदे दुप्पट केले जातात.

३. अनेक राज्यांत महिलांच्या नावे मालमत्ता नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्काचे दर कमी केले जातात. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारकडून हे अनुदान दिले जाते. जेव्हा घर महिलांच्या नावे नोंदणी केली जाते तेव्हा घर खरेदीदारांना स्टॅम्प ड्युटी शुल्कात सूट मिळते. उदाहरणार्थ, भारतातील काही उत्तरी राज्यांमध्ये, महिला आणि महिला- पुरुषांसाठी नोंदणीकृत दर पुरुषांसाठी नोंदणीकृत दरापेक्षा जवळपास २-३ ने कमी आहेत.

७७% महिला आहेत घर खरेदीदार
एका नवीन कुटुंबासाठी घर खरेदी करणे आणि पुरुषांच्या नावावर घर असणे ही सामाजिक प्रथा आहे. पण बदलत्या काळामध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाने या सामाजिक प्रथा देखील बदलल्या आहेत. एनरॉक २०२० च्या रिपोर्ट अनुसार देशात ७७% घर खरेदीदार महिला आहेत आणि रियल मालमत्ता खरेदीमध्ये ७४% निर्णय महिला घेत आहेत.