जर तुमच्याकडे ‘ही’ कागदपत्रे आहेत तर कोणताही ‘कायदा’ तुम्हाला देशाबाहेर काढू शकत नाही, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशभरात सीएए विरोधात मोठा गोंधळ सुरु आहे. एनआरसीच्या भीतीने देशात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. यामध्ये लोकांमध्ये अनेक प्रकारच्या संभ्रमावस्था होत्या जसे की, ज्या लोकांकडे 70 पासून जुन्या जमिनीचे कागदपत्र नाहीत. त्याचे नाव एनआरसीमध्ये असणार नाही आणि त्याला देशातून काढले जाईल.

सरकारकडून लोकांना हे सांगण्यात आले की, एनआरसीसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत त्याची माहिती देण्यात आलेली आहे. एनआरसीमुळे कोण देशाचा नागरिक आहे किंवा कोण नाही हे समजून येते. त्यामुळे ज्यांची नावे एनआरसी यादीत नसतील ते अवैध नागरिक असतील.

जर तुमच्याकडे ही चार कागदपत्रे असतील तर तुम्ही भारताचे नागरिक आहेत आणि या कागद पत्रांच्या आधारे तुम्ही तुमचे नागरिकत्व सिद्ध करू शकता.

1) जर तुमच्याकडे कोणताही सरकारी फोटो आयडी प्रूफ असेल तर तुम्हाला कोणीही असे म्हणू शकत नाही की, तुम्ही भारताचे नागरिक नाहीत.

2) याव्यतिरिक्त, आपल्याकडे जमीन मालकीचे कागदपत्रे असल्यास, कोणीही आपल्याला या देशातून हाकलू शकणार नाही.

3) जर तुमच्याकडे पॅनकार्ड किंवा वाहन परवाना असेल तरीही तुम्ही या देशाचे नागरिक असल्याचे सिद्ध होते.

4) तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात राहत असाल तर तुमच्या जवळच्या बँकेत तुमचे खाते असायला हवे कारण कागदपत्रांशिवाय कोठेही बँक खाते उघडता येत नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/