पीडीपी फोडण्याचा प्रयत्न कराल तर दहशतवादी जन्माला येतील, मेहबुबा मुफ्तींचा इशारा

जम्मू-काश्मीरः वृत्तसंस्था-

भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून काढता पाय घेतल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, मेहबुबा मुफ्ती यांनी अशा नेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात देखील केली आहे. मुफ्ती यांच्यासमोर पक्षाला एकजूट ठेवण्याचं सर्वात मोठ आव्हान आहे. एकंदर या सर्व घडामोडीवरून आज (शुक्रवारी) भाजपा आणि केंद्र सरकारला चेतावणी देत आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे त्यांनी  मुफ्ती यांनी  म्हटले आहे. एवढेच नाही तर हे सांगताना त्यांनी दहशदवादी सलाऊद्दीन आणि यासीन मलिक यांचा उल्लेख केला आहे.
[amazon_link asins=’B01591ZK3Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a2a7d10-8687-11e8-aff4-91ab687157a1′]

मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा आणि केंद्र सरकारला 1987 ची आठवण करुन देत हा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या की जर दिल्लीने 1987 प्रमाणे लोकांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती फार गंभीर होईल  तसेच ‘त्यावेळी जेव्हा एक सलाऊद्दीन आणि यासीन मलिक जन्माला आले होते, यावेळी परिस्थिती अजून चिघळेल’.

दरम्यान जम्मू काश्मीरमधील भाजपा नेते रवींद्र रैना यांनी हे वक्तव्य आपत्तीजनक असल्याचं म्हटलं आहे. भाजपा कोणतीही फूट पाडण्याचं किंवा पक्ष फोडण्याचं काम करत नसल्याचं त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4330d203-8687-11e8-8e8f-e3b36cab1619′]

पीडीपीचे विधान परिषद सदस्य यासिर रेशी यांनी सार्वजनिकपणे मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना बंदीपोरा जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वाढल्यामुळे मेहबुबा मुफ्ती चिंताग्रस्त आहेत.