Illegal Hoardings In Pune | पुणे शहरातील होर्डिंगचे होणार ऑडिट, अनधिकृत होर्डिंगकडून मागील वर्षाची वसुली केली जाणार

परवाना नुतनीकरणासाठी पालिकेकडून सात दिवसांची मुदत, असोसिएशनकडून मुदत वाढ देण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Illegal Hoardings In Pune | पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) आकाशचिन्ह विभागाकडून (PMC Skysign Department) शहरातील जाहिरात फलकांचे (होर्डिंग) ऑडिट करण्यात येणार. जे अनधिकृत होर्डिंग आहेत त्यांना नियमित करताना मागील पाच वर्षाचे शुल्क वसुल करण्यात येणार आहे. तर ज्या होर्डिंग मालकांनी परवाना नुतनीकरण करुन घेतलेला नाही अशा दीड हजाराहून अधिक जणांना नोटीस पाठवण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. (Illegal Hoardings In Pune)

होर्डींग लावण्यासाठी पालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरात अनधिकृत 1 हजार 826 होर्डिंग असून त्यांना प्रत्येक वर्षी परवाना नुतनीकरण करुन घेण्याचे बंधनकारक आहे. असे असताना चालू वर्षामध्ये केवळ 246 होर्डिंग मालकांनी त्यांचा परवाना नुतनीकरण करुन घेतला आहे. ज्यांनी अद्याप परवाना नुतनीकरण करुन घेतले नाही अशांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसात परवाना नुतनीकरण केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा परवाना व आकाशचिन्ह विभागाने होर्डिंग मालकांना दिला आहे. नुकतेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांची बैठक पार पडली. यामध्ये जे होर्डिंग मालक सात दिवसात परवाना नुतनीकरण करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत. (Illegal Hoardings In Pune)

स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल तपासणार

माधव जगताप (Madhav Jagtap PMC) पुढे म्हणाले, काही महीन्यापूर्वी होर्डिंग कोसळून दुर्घटना होण्याच्या घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने परवाना नुतनीकरणासाठी अर्ज करताना संबंधित होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचा अहवाल सादर करण्याचे बंधनकारक केले होते. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अहवालांची आम्ही तपासणी करणार असून काही अहवालात जुजबी माहिती दिली आहे. ज्या होर्डिंगचे परवाना नुतनीकरण होणार नाही, ते अनधिकृत ठरवले जातील.

बेकायदेशीर होर्डिंग कडून मागील 5 वर्षाची वसुली

नव्याने होर्डिंग उभे करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या परवानगी दिली जाईल. मात्र आत्ता पर्यंत जे बेकायदेशीर होर्डिंग उभारून त्याचा वापर करीत होते. अशा सर्व होर्डिंगचे ऑडीट करून त्यांच्याकडून नियमितीकरणाकरीता मागील पाच वर्षाचे शुल्कही भरून घेतले जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली.

दोन महिन्यांची मुदतवाढ द्या

पालिकेने होर्डिंग मालकांना नोटीस पाठवून सात दिवसांत परवाना नुतनीकरण करुन घेण्यास सांगितले आहे.
यावर पुणे आऊटडोअर अॅडर्व्हटायझिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब गांजवे यांनी निवेदन पाठविले आहे.
जाहीरात फलकधारकांनी मार्च २०२४ पर्यंतची आकाशचिन्ह फी भरली आहे.
परवाना नुतनीकरणासाठी महापालिकेने दोन महीन्यांची मुदतवाढ दिली पाहीजे,
अशी मागणी गांजवे यांनी केली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंतची फि भरली,
परंतु नुतनीकरण न झालेल्या जाहीरात फलक हा बेकायदेशीर ठरवू नये,
जागा मालकांचे संमतीपत्र आणि होर्डींगधारकाचे हमीपत्र याचा मसुदा पंधरा दिवसांपुर्वी अंतिम केला गेला आहे. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे गरजेचे आहे असेही गांजवे यांनी नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News – Nutritious School Food | बालवाड्यांना पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांचे 6 महिन्यांचे पैसे पुणे महापालिकेने थकविले