Pune PMC News – Nutritious School Food | बालवाड्यांना पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांचे 6 महिन्यांचे पैसे पुणे महापालिकेने थकविले

उधार उसनवारीवर पुरवत आहेत पोषण आहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News – Nutritious School Food | महापालिका शिक्षण मंडळाकडील बालवाड्यांना शालेय पोषण आहार (Poshan Aahar) पुरविणार्‍या तब्बल १५० महिला बचत गटांचे मार्चपासूनचे बील अद्याप थकले आहे. यासंदर्भातील ठरावच प्रशासनाने केला नसल्याने महिला बचत गटांना (Mahila Bachat Gat) दुकानदारांकडून उधार घेउन बालवाडीतील मुलांचे ‘पोषण’ करावे लागत आहे. अशातच प्रशासनाकडे दाद मागणार्‍या या बचतगटांना ‘दिवाळीनंतर’चे आश्‍वासन देण्यात येत असल्याने बचतगटातील महिलांची दिवाळी ‘अंधारमय’च होणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Pune PMC News – Nutritious School Food)

शिक्षण मंडळाच्या बालवाड्यांना महिला बचत गटांच्या माध्यमांतून पोषण आहार देण्यात येतो. पोहे, उपीट, दाल खिचडी यासारख्या अन्न पदार्थांचा यामध्ये समावेश आहे. पोषण आहार देणारे सुमारे १५० बचत गट असून त्यामध्ये सुमारे ७५० हून अधिक महिला कार्यरत आहेत. शालेय पोषण आहाराचे दरमहा बील देणे अपेक्षित आहे. परंतू प्रशासनाने मार्च पासून अद्याप हे बिलच दिले नसल्याचे समोर येत आहे. शालेय सुट्टयांचा महिना वगळता प्रत्येक बचत गटाचे सरासरी १५ हजार रुपये याप्रमाणे साधारण पाच ते सहा महिन्यांचे बील थकलेलेे आहे. (Pune PMC News – Nutritious School Food)

यासंदर्भात बचत गटांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंडळाकडे यासाठी पाठपुरावा केला असता, अद्याप ठराव झालेला नाही, असे त्यांना सांगण्यात येत आहे. या प्रतिनिधींनी बिलासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जाण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना वरिष्ठांकडे जाण्यापासून रोखण्यात येत आहे. बिल मिळत नसले तरी पोषण आहार सुरू ठेवावा लागत असल्याने दुकानदारांकडून उधारीवर वस्तू घेण्यात येत आहे. काही महिला कुटुंबियांकडून, स्वत:च्या बचतीतून अथवा उधार उसनवारीवर पोषण आहाराचे काम करत आहेत. परंतू सर्वसामान्य कुटुंबातील महिला असल्याने आणि उधारीचे लिमिट संपल्याने व स्वत:कडील बचतही संपल्याने यंदा दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्‍न देखिल पडल्याचे, बचत गटांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

बचत गटांची बिले का दिली गेली नाहीत, याची माहिती घेत आहोत. बिले देण्यामध्ये काही अडचणी आल्या असतील किंवा बचत गटांकडून पुर्तता झाली नसेल त्याची पुर्तता करून तातडीने बिले देण्यात येतील.

  • विक्रम कुमार, महापालिका आयुक्त (IAS Vikram Kumar)

१३ वर्षांपासून ६ रुपयेच दर, परवडणार कसा?

बालवाडीतील मुलांना दररोज प्रती मुल ६ रुपये प्रमाणे पोषण आहार देण्यात येतो.
प्रत्येक मुलाला साधारण १०० ग्रॅम अन्न पदार्थ देण्यात येतात. हा दर १३ वर्षांपुर्वीचा आहे.
या कालावधीत महागाई शंभर पटीने वाढली आहे. गॅस सिलेंडरचे दर तीनपट झाले आहेत.
पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे.
या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर प्रति मुल १० रुपये मिळावेत, अशी प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. परंतू प्रशासन दरवाढ तर दूरच परंतू सहा-सहा महिने पैसे थकवत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा आमच्या समोर प्रश्‍न आहे.

  • साधना मिसाळ (Sadhana Misal), महिला अध्यक्ष, लष्कर ए भिमा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Food Plaza On Sarasbaug Chowpatty | सारसबाग चौपाटीवरील ‘फूड प्लाझा’चा सुधारीत विकास आराखडा

Pune PMC News | पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांमधील ड्रेनेजलाईनसाठी बँकांकडून 550 कोटी रुपये कर्ज उचलणार