Illegal rooftop Hotels In Pune | बेकायदा रुफटॉप हॉटेल्सवर कारवाईसाठी महापालिका, पोलिस, ‘एक्साईज’च्या अधिकार्‍यांची लवकरच समिती स्थापन होणार

पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासन झाले गतिमान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Illegal rooftop Hotels In Pune | शहर व जिल्ह्यातील रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकाम आणि रुफ टॉपवरील अनधिकृत हॉटेल्सवर कारवाईसाठी महापालिकांचे अधिकारी, पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत, अशी माहिती महापालिका Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Illegal rooftop Hotels In Pune)

पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या आढावा बैठकीमध्ये पवार यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापनेबाबत व पुढील कार्यवाहीसाठी बैठक होणार असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. शहरात मोठ्याप्रमाणावर हॉटेल्स असून अनेक इमारतींवर टेरेसवही हॉटेल्स आहेत. यापैकी बरेच ठिकाणी रुफटॉपवरील हॉटेल्स ही बेकायदा असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षात सातत्याने रुफटॉप हॉटेलमध्ये आगीच्या घटना तसेच अन्य घटना घडल्यानंतर ही हॉटेल्स खर्‍या अर्थाने चर्चेत आली आहेत. प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये या हॉटेल्सची चलती आहे. (Illegal rooftop Hotels In Pune)

पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील ७२ हून अधिक रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई देखिल केली आहे. परंतू यानंतरही काही हॉटेल्स पुन्हा पुन्हा सुरू केली जात असल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी देखिल बेकायदा रुफटॉप हॅाटेल्सबाबत कडक पावले उचलण्याचे आदेश दिल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

खडकवासला धरण प्रदूषण रोखण्यासाठी पीएमआरडीए करणार विकास आराखडा

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरणाच्या क्षेत्रात जवळपास २४ गावे आहेत. तसेच १०० हून अधिक रिसॉर्ट व रेस्टॉरंट आहेत. या गावांचा विकास होत असताना बांधकामेही वाढत आहेत. येथे सांडपाणी वाहून नेण्याची तसेच त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसल्याने संाडपाणी खडकवासला धरणात येत आहे. यामुळे पाणी प्रदूषण वाढले आहे, भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या निर्माण होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने या गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा विकास आराखडा तयार करावा. नियमांचे उल्लंघन करणार्‍या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीए च्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा;
भूसंपादनाशी निगडीत दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा ! रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या
वतीने भिडे वाडा येथे दिवाळीपुर्वीच दिवाळी