माझ्यावर दगडफेक करुन आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे : मुख्यमंत्री

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाईन

पंढरपूरला महापूजेसाठी येणार नसल्याचे घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले , मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते . काही संघटनांना हे माहित असूनही मराठा समाजाला उचकवण्याचे काम केले जात असून, माझ्यावर दगड फेक करुन जर आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6aae8ac4-8d94-11e8-9430-356b330fbd2d’]

पंढरपूरच्या वारीची परंपरा 800 वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील याला सरंक्षण दिले होते. मुख्यमंत्र्यांनी पूजा करावी ही परंपरा आहे. मी तीन वर्षांपासून जातो. मात्र काही संघटनांनी याला विरोध केला. ही भूमिका चुकीची असून, विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. संरक्षणात ती केली जाऊ शकते. पण वारकऱ्यांच्या जीवाला धोका नको म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात होणाऱ्या मेगा भरतीत मराठा तरुणांना ओपनमधून भरती असूनही 16 टक्के पदं ठेवणार आहोत. आम्ही मराठा तरुणांचं नुकसान करणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.