शिरूर तालुक्याच्या पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात पडून असलेले 40 ऑक्सिजन बेड तात्काळ सुरू करा – भाजपा

शिक्रापूर : प्रतिनिधी –  शिरुर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयातील ४० ऑक्सिजन चे बेड तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी दिली.

याबाबत भाजपा पुणे ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, उद्योग आघाडीचे संयोजक संजय पाचांगे, आंबेगाव भाजपा अध्यक्ष ताराचंद कराळे, नगरसेवक अरुण भेगडे आदींनी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून मागणीचे निवेदन दिले.
शिरूर तालुक्यातील पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात ४० ऑक्सिजन बेड आहेत.मात्र किरकोळ दुरुस्तीअभावी सुरू झालेले नाहीत.त्याचबरोबर तेथील रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी यांनी,ऑक्सिजन सिलेंडर ची उपलब्धता पाहून तातडीने ऑक्सिजन बेड सुरू करण्यात येईल,तसेच जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून डॉक्टर व नियमित स्टाफ ची नेमणूक करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी दिली आहे.