Diet Tips : कोरोना काळात इम्युनिटी सिस्टम मजबूत बनवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरस महामारीचा प्रकोप थांबता थांबत नाही. कोरोनामुळे रोज लाखो लोक संक्रमित होत आहेत. अशा स्थितीत इम्यून सिस्टम मजबूत असणे आवश्यक आहे. इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी हेल्दी डाएट घेणे खुप आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्यांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने फायदा होऊ शकतो.

लसून
लसूनमध्ये अँटीबायोटिक आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात. यामुळे संसर्ग दूर राहण्यास मदत होते. तसेच ब्लड शुगर नियंत्रित करणे, हृदय निरोगी ठेवणे आणि फुफ्फुसांशी संबंधीत समस्यांवर उपचार करण्यात उपयोगी आहे.

आवळा
आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे इम्युनिटी चांगली राहते. गरम पाण्यात खिसून टाकून हे पाणी पिऊ शकता. हा अँटीऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे त्वचा आणि केस चमकदार होतात.

मध
रिकाम्यापोटी गरम पाण्यासह एक चमचा मध वजन कमी करण्यासाठी, त्वचा आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी रामबाण उपाय आहे.

बदाम
बदाम वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. स्मरणशक्ती वाढते. कोलेस्ट्रॉल कमी होतात. भिजवलेले बदाम डायबिटीज रूग्णांसाठी चांगले आहेत. हे कॅन्सरला रोखतात. तणावाशी लढण्यास मदत करतात, चांगली झोप येते.

मनुके
रोज सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले मनुके सेवन केल्याने अ‍ॅसिडिटी, थकवा, कमजोरी, रक्ताची कमतरता इत्यादी दूर होते. हाडे मजबूत होतात, डायबिटीज नियंत्रणात राहतो, स्मरणशक्ती वाढते, वजन कमी होते, काविळीसारख्या धोकादायक आजारात मदत होते.

आक्रोड
रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले आक्रोड खाल्ल्याने डायबिटीज कंट्रोल ठेवणे, वजन कमी करणे, औदासिन्य आणि तणाव, हाडे मजबूत करण्यात मदत होते. तसेच हृदय निरोगी ठेवणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि बद्धकोष्ठता सारख्या रोगात लाभदायक आहे.