MPSC ची महत्वाची घोषणा ! ‘त्या’ उमेदवारांना PPE कीट देणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने रविवारी (दि. 21) होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर एमपीएससीने जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोविड सदृश्य लक्षणे आढळून येतील त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. तसेच उमेदवारांना एमपीएससीकडून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहे.

जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा पट्टी बांधणे आवश्यक आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. स्वतःचा जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन यावी. राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. तसेच सुरक्षित अंतर पाळावे, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.